अखेर रायगड जिल्ह्यातील 108 क्रमांकावरील रुग्णवाहिका थांबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance Strike
अखेर रायगड जिल्ह्यातील 108 क्रमांकावरील रुग्णवाहिका थांबली

अखेर रायगड जिल्ह्यातील 108 क्रमांकावरील रुग्णवाहिका थांबली

पाली - नियमित वेतन (Salary) व कोरोना काळातील बोनस (Bonus) मिळावा आणि पगारवाढ (Payment Increment) व्हावी या मागण्या पूर्ण होण्यासाठी मागील महिन्यात जिल्ह्यातील 108 क्रमांक रुग्णवाहिका चालकांनी (Ambulance Driver) संबधीत विभागांना निवेदन दिले होते. मात्र यावर 21 दिवस होऊनही अखेर कोणताच तोडगा न निघाल्याने बुधवारी (ता.6) सायंकाळपासून जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी बेमुदत कामबंद आंदोलन (Agitation) पुकारले आहे.

रायगड जिल्ह्यातील 108 क्रमांकाच्या एकूण 23 रुग्णवाहिका असून 55 रुग्णवाहिका चालक आहेत. हे रुग्णवाहिका वाहन चालक (पायलट) सन 2014 पासून बी.व्ही.जी.इंडीया लि. कंपनीमध्ये कंत्राटी रुग्णवाहिका चालक म्हणून कामावर रुजू आहेत. पण 2014 पासून आजपर्यंत आमच्या किमान वेतनात एकही रुपयाची वाढ झालेली नाही. तसेच आम्हाला वेतन कोणत्या स्वरूपात येते याची विचारणा केली असता विचारून सांगतो, उद्या सांगतो, मला माहीत नाही. अशा प्रकारच्या उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. शिवाय संबंधीत अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मागण्यासंदर्भात कोणतेच निर्णय आले नाही. त्यामुळे अखेर रुग्णवाहिका चालकांसमोर कामबंद आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही.

जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही व आमच्या मागण्यांचा विचारही केला नाही. आम्ही अजूनही आमच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेला येण्यास तयार आहोत.

- ज्ञानेश्वर जगताप, उपाध्यक्ष, 108 रुग्णवाहिका संघटना, रायगड

माणुसकी जागृत

कामबंद आंदोलन सुरू केलेले असले तरी देखील हे रुग्णवाहिका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी घरुन रुग्णालयात तसेच रस्त्यावर झालेल्या अपघातातील रुग्णाला जवळच्या रुग्णालयात सोडणार आहेत.

Web Title: Ambulance Driver Strike In Raigad District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top