ऍमेटी विद्यापिठ मुंबईतील विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

अमित गवळे  
सोमवार, 19 मार्च 2018

विद्यापिठातील 14 विद्यार्थ्यांनी फणसवाडी आदिवासीवाडीतील ग्रामस्तांशी संवाद साधला. हे सर्व विद्यार्थी ग्रामिण विकास या विषयाचे शिक्षण घेत असून त्यांनी फणसवाडीला भेट देवून पथनाट्य सादर केले.

पाली (जि. रायगड) - ऍमेटी विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी सुधागड तालुक्यातील फणसवाडी या आदिवासीवाडीला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी येथील लोकांना व तरुणांना शास्वत ग्रामविकासासंदर्भात प्रबोधन व मार्गदर्शन केले.

विद्यापिठातील 14 विद्यार्थ्यांनी फणसवाडी आदिवासीवाडीतील ग्रामस्तांशी संवाद साधला. हे सर्व विद्यार्थी ग्रामिण विकास या विषयाचे शिक्षण घेत असून त्यांनी फणसवाडीला भेट देवून पथनाट्य सादर केले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या आदिवासी समाजघटकाला मुख्य प्रवाहात सामील करुन घेवून त्यांचा विकास साधण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी लोकशिक्षणाची चळवळ, स्वच्छता, आरोग्य, व्यसनमुक्ती, आदी विषयांवर प्रबोधन केले. आदिवासी बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थीक सशक्तीकरण होण्याच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांनी काम करण्याचा संकल्प यावेळी केला. तसेच येथील तरुणांशी विविध विषयांवर संवाद साधला व त्यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी मौलिक मार्गदर्शन केले. व लहान मुलांसोबत खेळून त्यांना देखील प्रोत्साहन दिले. प्रत्यक्ष क्षेत्र कार्यात जावून आदिवासी समाजबांधवांचे प्रश्न समजून घेणे, तसेच प्रश्नांचा शास्त्रीय अभ्यास करुन त्यावर उपाययोजना करणे हा या भेटीमागील मुळ उद्देश असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकासाचे धडे गिरविले. भविष्यात आदिवासीवाडीच्या सर्वांगिण व शास्वत विकासासाठी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढविणार असल्याची ग्वाही ऍमेटी विद्यापिठातील प्राध्यापक अमेय महाजन व डॉ. मिरा लिमये यांनी दिली.

Web Title: amity university mumbai students done good activity