फसवणूक प्रकरणातील अमोल तोडकरी मुंबईत जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - आयकर खात्याचा अधिकारी असल्याचे भासवून नोकरीच्या आमिषाने तरुणांची लाखोची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारला मुंबईतून जेरबंद केले. ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. संशयिताला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी तालुक्‍यातील काळबादेवी येथील अन्य तिघांनाही अटक होण्याची शक्‍यता आहे. 

अमोल विठोबा तोडकरी (वय ३२, रा. शिवाजी तलाव, साईनाथ अपार्टमेंट- घणसोली नवी मुंबई, मूळ - कार्जिडा-राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. १० मार्च २०१७ ते १७ जुलै २०१८ या कालवधीत हा प्रकार घडला होता. काळबादेवी येथील नरेश जनार्दन मयेकर (वय ४७), संगीता संभाजी जोशी (४७), महेश बाबू जोशी (५१, सर्व रा. काळबादेवी) या तिघांना हाताशी धरून अमोल तोडकरी या संशयिताने तक्रारदार उपेंद्र अनिल मालगुंडकर (वय ३१, रा. मयेकरवाडी-काळबादेवी) यांची कागदपत्र घेऊन त्यांच्याकडून ७५ हजार घेतले होते. उर्वरित रक्कम बॅंक खात्यात भरणा करून त्यांची ६ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केली होती. 

दरम्‍यान, कोल्हापूर येथील अमोल तोडकरी इन्कम टॅक्‍स अधिकारी असून ते मुलांना सरकारी नोकरी लावतात. ते ओळखीचे आहेत तुमचे काम करून देतील, असे नरेश मयेकर यांनी तक्रारदारांना सांगितले होते. ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नरेश मयेकर, संगीता जोशी, महेश जोशी यांचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या प्रकरणाचा सूत्रधार तोडकर यांच्या मुसक्‍या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

Web Title: Amol Todakari arrested in Mumbai