Vidhan Sabha 2019 : ...या आरोपामुळेच तटकरेंना युतीचा लाल दिवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

शरद पवार यांचे सगळे दात पडले आता फक्त सुळेच राहिलेत आहेत.

- अनंत गीते

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर घिरट्या घालत होते. शिवसेना प्रवेशासाठी ते खासदारकीचा राजीनामा ही द्यायला तयार होते. मात्र घोटाळ्याच्या आरोपामुळे त्यांना शिवसेनेसह भाजपमध्येही प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी आज कोंढे येथे केला. 

रत्नागिरी : दापोलीत सुमारे दोन हजार ग्रॅम गांजा जप्त 

गुहागर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी कोंढे येथे आज महायुतीची सभा झाली. कोंढे येथील रंगल सभागृहात कार्यकर्ता मेळावा झाला.

राजापुर तालुक्यातील ‘धाऊलवल्ली’ला राष्ट्रीय ग्रामगौरव पुरस्कार 

गीते म्हणाले, गुहागरमधून जिल्हाप्रमुख सचिन कदम दावेदार असताना पक्ष श्रेष्ठींचा आदेश मानून ते भास्कर जाधवांच्या पाठीशी उभे राहिले. त्याबद्दल गीतेनी सचिन कदम यांचेही आभार मानले.

बीएमसी चोर कोकणात आला अन् परत गेला; निलेश राणेंचा पुन्हा प्रहार  

शरद पवार यांचे सगळे दात पडले आता फक्त सुळेच राहिलेत आहेत.

- अनंत गीते

गुहागर मधील सर्व दिगग्ज आज व्यासपीठावर एकत्र आहेत, याचा अर्थ एकच होतो की भास्कर जाधव मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वासजिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी व्यक्त केला. जिल्हाप्रमुख सचिन कदम, चिपळूण गुहागर तालुका प्रमुख संदीप सावंत, बंदुकवाले, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष रामदास राणे, मोहन आंबरे आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anant Gite comment on Sunil Tatkare in Chiplun