आंगणेवाडी यात्रेत गर्दीचा विक्रम - नरेश आंगणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मालवण - ‘आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत भराडी देवीच्या कृपाशीर्वादाने लाखो भाविकांची सेवा करण्याचे भाग्य आंगणेवाडीला लाभते. कुणकेश्‍वर यात्रेनंतर आंगणेवाडीची यात्रा झाली तरी यात्रेने गर्दीचे विक्रम मोडले. 

मालवण - ‘आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत भराडी देवीच्या कृपाशीर्वादाने लाखो भाविकांची सेवा करण्याचे भाग्य आंगणेवाडीला लाभते. कुणकेश्‍वर यात्रेनंतर आंगणेवाडीची यात्रा झाली तरी यात्रेने गर्दीचे विक्रम मोडले. 

यात्रा यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या शासनाच्या सर्व विभागांचे आंगणेवाडी कुटुंबीय ऋणी राहतील,’ असे प्रतिपादन आंगणेवाडी विकास मंडळाचे स्थानिक अध्यक्ष नरेश आंगणे यांनी काल आंगणेवाडी येथे केले. आंगणेवाडी यात्रेचा समारोप कार्यक्रम काल झाला. कार्यक्रमास मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, सरपंच लक्ष्मी पेडणेकर, डॉ. दिगंबर आंगणे, सीताराम आंगणे, आत्माराम आंगणे, रघुनाथ आंगणे, मधुकर आंगणे, घनश्‍याम आंगणे, छोटू आंगणे, काका आंगणे, शामसुंदर आंगणे आदी उपस्थित होते.

या वेळी आंगणेवाडी विकास मंडळ मुंबईच्या वतीने नरेश आंगणे, डॉ. दिगंबर आंगणे, रघुनाथ आंगणे यांचा सन्मानचिन्ह शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आंगणेवाडीतील तरुण वर्ग व ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या स्वाभिमानी वृत्तीमुळे पोलिस फौज कमी असतानाही यात्रोत्सवाला कुठेही गालबोट लागले नाही. प्रत्येकाने जबाबदारीने काम पाहिल्यामुळे तसेच मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे यात्रोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. यात्रा यशस्वीतेसाठी अनंत आंगणे, रोहन आंगणे, पोलिस विभाग, वीज वितरण, एसटी, कोकण रेल्वे, ग्रामपंचायत, सर्व पत्रकार यांचे आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आभार मानण्यात आले. मंदिर परिसर वगळता इतरत्र मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, मसुरे ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नरेश आंगणे यांनी या वेळी केली. 

या वेळी सतीश आंगणे, आनंद आंगणे, विशाल आंगणे, विद्या आंगणे, चंद्रकांत आंगणे, बबन आंगणे, जया आंगणे, बाबू आंगणे, प्रसाद आंगणे, समीर आंगणे, जयेश आंगणे, कीर्तीराज आंगणे, बंडू चव्हाण, पंकज आंगणे, नंदू आंगणे, सचिन आंगणे, दत्ता आंगणे, बाबा आंगणे यांच्यासह आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते.

मधुकर आंगणे यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर आंगणे यांनी आभार मानले.

Web Title: Angnewadi Yatra congested record