आंबेनळी अपघाताची पुनरावृत्ती टळली

st
st

महाड : पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या एसटी बसला वरंध घाटातील एका अवघड वळणावर होणारा मोठा अपघात काल (ता. 8) टळला असुन सुदैवाने या बसमधीस सर्व 72 प्रवासी सुखरुप आहेत. घाटात केबलसाठी खोदलेल्या चरांमुळे बसचे पुढील चाक घसरल्याचा अंदाज असुन उर्वरित पाचही चाके रस्त्यावर राहिल्याने आंबेनळी अपघाताची पुनरावृत्ती टळली.

महाड पुणे मार्गावरील वरंध घाट हा ही धोकादायक घाट असुन महाड हद्दीत आवश्यकती सुरक्षा उपाययोजना घाटात करण्यात आलेली असली तरी केबलसाठी केलेली खोदाई आज प्रवाशांच्या जीवावर बेतली असती. खोदलेल्या चरातील माती रस्त्यावर पसरल्याने वाहने नियंत्रणात राहत नाहीत यामुळे भोर आगाराच्या पुणे महाड या बसला होणारा मोठा अपघात थोडक्यात टळला. 

काल सकाळी साडेअकरा वाजता वरंध घाटात एका वळणावर चालकाच्या बाजूला बसचे चाक घसरले व एक चाक संरक्षक कठड्याबाहेर आले. चालक मोहन बांदल यांनी बस कौशल्याने नियंत्रणात आणली आणि दगडी कठड्याला बस टेकल्याने बस कोसळता कोसळता वाचली. या धक्क्याने प्रवाशात आरडाओरड सुरु झाली. परंतु बसचा बहुतांशी भाग रस्त्यावर राहिल्याने प्रवाशांना सुखरुप बाहेर पडता आले. बस थोडी बाहेर गेली असती तरी मोठा अनर्थ झाला असता.या सर्व प्रवाशांना महाड आगाराच्या अन्य बसने महाडला सोडण्यात आले. आगार प्रमुख ए.पी.कुलकर्णी, वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी तात्काळ येथे धाव घेतली व क्रेनने वस बाहेर काढण्याचे काम दुपारी चार वाजता पूर्ण केले. या ठिकाणी खोदकामामुळे आलेल्या मातीमुळे पुढेही अपघात होऊ शकतात याची खबरदारी संबंधित विभागाने घेतली पाहिजे असे शिवाजी जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com