दोडामार्गमध्ये आणखी एकास स्वाइन फ्लू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

दोडामार्ग - तालुक्‍यात स्वाइन फ्लूचा धोका वाढण्याची भीती आहे. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन होती, ती आता तीन झाली आहे. साटेली भेडशी परिसरात तिसरा रुग्ण आढळला. सदाशिव सावंत (वय 65) असे त्यांचे नाव आहे. 

गेल्या आठवड्यात सोनावल व घोटगेवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्या दरम्यान शनिवारी साटेली भेडशी आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या सदाशिव सावंत यांच्या रक्त तपासणीनंतर त्यांनाही स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे. 

दरम्यान, या संदर्भात डॉ. तुषार चिपळूणकर यांची भेट घेतली. तालुक्‍यात स्वाइन फ्लूचा तिसरा रुग्ण सापडल्याच्या बातमीला त्यांनी दुजोरा दिला; मात्र स्वाइन फ्लूला घाबरण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""विदर्भ, मराठवाडा, नाशिक येथील स्वाइन फ्लू आणि आपल्याकडील स्वाइन फ्लू याच्या तीव्रतेत फरक आहे. आपल्याकडील स्वाइन फ्लू "इन्फ्लुएंझा' प्रकारातील आहे. सुरवातीलाच त्याचे निदान व उपचार झाले तर माणूस दगावण्याची भीती नाही. शिवाय त्यावर आवश्‍यक औषधोपचार आपल्या सरकारी आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत. प्रतिबंधात्मक लसही उपलब्ध आहे.'' 

ते म्हणाले, ""माकडतापावर निश्‍चित औषध किंवा उपचार नाही, तसे स्वाइन फ्लूबाबत नाही. त्यावर रामबाण औषधे उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला ताप, सर्दी, खोकला झाला तर अंगावर न काढता त्वरित उपचार करावे. घशातील द्रावाची, रक्ताची तपासणी करून घ्यावी. त्यातून योग्य निदान व वेळेत उपचार होतील आणि भीती उरणार नाही.'' या वेळी डॉ. चिपळूणकर यांनी तिन्ही रुग्ण चांगले असून त्यांना कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: Another swine flu in Dodamarg