भार्जेच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या अनुसया पवार यांची बिनविरोध निवड

अमित गवळे
शुक्रवार, 18 मे 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. रविवारी (ता.27) तालुक्यातील13 ग्रामपंचायतीसाठी (पाली ग्रामपंचायत बहिष्कार टाकल्यामुळे) मतदान होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या भार्जे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या अनुसया दौलत पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. परिणामी त्यांना सरपंचपदी बिनविरोध निवडून अाल्या अाहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधागड तालुकाध्यक्ष रमेश साळुंखे यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याचे बोलले जात आहे. भार्जे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनविरोध सरपंच निवडून अाणण्यासाठी साळूंखे यांच्यासह माजी सरपंच राम उफाळे, यंगस्टर्स मंडळाचे उपाध्यक्ष राम दळवी, गणपत चव्हाण, सखाराम आयरे, अनिल पिंगळे, किसन वाघमारे अाणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साळुंखे यांनी सांगितले की आमचे नेते राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल यांचे नेतृत्वाखाली व गीता पालरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १० ते १५ वर्षात भार्जे ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकासकामे तसेच ग्रामस्थांची वैयक्तिक कामे आंम्ही कायम करीत अाहोत. त्यामळेच आम्ही येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध अाणू शकलो.
 
Web Title: anusaya pawar elected as sarpanch of bharje raigad