उठा, जागे व्हा! अवयवदन व रक्तदानाच्या संकल्पाशिवाय थांबू नका!

अमित गवळे
बुधवार, 28 मार्च 2018

पाली (रायगड) : घर व लग्न या माणसाच्या जिवनातील दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. पण या दोन्ही गोष्टी करतांना कुणाल पवार या अवलिया  प्राथमिक शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आपल्या गावी नवीन घराबाहेर त्यांनी अवयवदान व रक्तदानाचा संदेश देणारी प्रबोधनात्मक पाटी लावून जनजागृती केली आहे.

पाली (रायगड) : घर व लग्न या माणसाच्या जिवनातील दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. पण या दोन्ही गोष्टी करतांना कुणाल पवार या अवलिया  प्राथमिक शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आपल्या गावी नवीन घराबाहेर त्यांनी अवयवदान व रक्तदानाचा संदेश देणारी प्रबोधनात्मक पाटी लावून जनजागृती केली आहे.

कुणाल पवार हे सुधागड तालुक्यातील राजिप प्राथमिक शाळा पायरीचीवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या गावी जळगाव शहरात  गुजराल पेट्रोल पंपापासून जवळ असलेल्या पिंप्राळा शिवारातील संजीवनी नगरातील आपल्या नवीन घराबाहेर "उठा,जागे व्हा!रक्तदान व अवयवदानाच्या संकल्पाशिवाय थांबू नका! रक्तदान करा! अवयवयदान करा!" हा संदेश असलेली पाटी लावून जनजागृती केली आहे.

स्वत:च्या घराबाहेर रक्तदान करा! अवयवदान करा!अशी सामाजिक संदेश देणारी पाटी लावून प्रबोधन करण्याचा विचार कुणाल पवार यांच्या मनात आला. त्याप्रमाणे ते गजू आर्ट्स येथे पाटी बनवण्यासाठी घेले असता तेथील मालक गौरव तांबट यांनी ही पाटी आपण कोठे लावणार आहात असे विचारले. कुणाल पवार यांनी घराबाहेर सांगितल्यावर गौरव यांनी आश्चर्य व्यक्त करत या अभिनव उपक्रमाबाबत अभिनंदन तर केलेच व लागलीच सदर पाटी बनवून आपणांस योग्य वाटते तेवढेच पैशे देण्याचे सांगितले. तुमच्यासारखे लोक आमच्याकडे फार कमी येतात असे बोलून पवार यांचे कौतुक केले.

कुणाल पवार यांनी त्यांच्या लग्नाच्यावेळी जुन्या रुढी, परपंरा व अनावश्यक खर्चाला फाटा देत सपत्नीक अवयवदानाचा संकल्प करुन तसा फॉर्म भरुन दिला. स्वताच्या वाढदिवसाला रक्तदान करुन दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.  पण हे फक्त त्यांनी स्वता:पुरता मर्यादित न ठेवता समाजात जनजागृती होण्यासाठी व या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न चालु असतात. यापूर्वी त्यांनी पाली येथील गणेशत्सवात, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात व वेळोवेळी त्यांच्या कार्यक्षेत्रात ते अवयवदान व रक्तदान याबद्दल जनजागृती व प्रबोधन करत असतात.

तसेच पवार यांनी लग्नाच्या वाढदिवशी आदिवासी गरीब, गरजूंना वस्त्रदान करुन व नववर्षाचे स्वागत गरीब, गरजूंना अन्नदान करुन दरवर्षी याप्रमाणे करण्याचा संकल्प केला आहे.  त्यांचे हे कार्य अनेकांना दिशादायक व प्रेरणादायी ठरणारे आहेत.

विद्यार्थी असो की पालक, तरुण असो कि वृद्ध घरासमोरुन येणारा - जाणारा प्रत्येक वाटसरु हया पाटीवरील सामाजिक संदेश वाचून पुढे जात आहे. काहींनी *वा! वा! खूप सुंदर प्रबोधनात्मक पाटी लावली आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त क़ेली. तर अनेक जण पटिवरील संदेश वाचून अचंबित होत आहेत. आणि या उपक्रमाचे कौतुक देखील करत आहेत.

माझे घर रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे घराबाहेर रक्तदान करा व अवयवदान करा याबाबत पाटी लावून प्रबोधन करण्याचा विचार मनात आला.  मी ज्या चळवळीचा छोटा भाग आहे त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे. आज लाखों लोकांना रक्त व अवयवाची गरज आहे.सरकारने अवयवदान करणाऱ्या व्यक्तींना विशेष सवलत दिल्याशिवाय व अवयवदान करणाऱ्याचे अवयव गगरजूंनाच दिले जातील त्यात कोणताही गैरप्रकार होणार नाही. याबाबत सकारात्मक पाऊल उचलून आश्वस्थ केल्यास या चळवळीत सहभागी होणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढेल असे मला वाटते, असे मत कुणाल पवार यांनी व्यक्त केले.

Web Title: appeal of organ donation and blood donation