कोयनेतील वीज निर्मितीनंतरच्या पाणी वापराचा अभ्यास करण्यासाठी कंपनीची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

दाभोळ - कोयना धरणातील वीज निर्मिती नंतरच्या पाण्याचा वापर कोकणासाठी करण्यात यावा, अशी मागणी रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यावर या संदर्भात कार्यवाहीला वेग आला. याबाबत सविस्तर अभ्यास करणेसाठी केंद्र शासनाच्या जलसंधारण, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत वाप्कोस लिमिटेड या कंपनीची नियुक्‍ती केल्याची माहिती रामदास कदम यांनी दापोलीत दिली.

वीजनिर्मितीनंतर कोयना धरणातील ६७.५० अब्ज घन फूट पाणी वाशिष्ठित सोडण्यात येते. त्यापैकी बहुतेक पाणी वापराअभावी समुद्राला जाऊन मिळते. या पाण्याचा वापर कोकणामध्ये सिंचनासाठी तसेच पाणीपुरवठ्यासाठी करावा, यासाठी १ नोव्हेंबरला एक बैठक झाली. त्यात कोयना अवजल राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करण्यासाठी तसेच सविस्तर अभ्यास करण्याचे काम नवी दिल्लीच्या वाप्कोस लिमिटेड, या केंद्रशासनाच्या अंतर्गत असलेल्या कंपनीकडून करण्यात यावे असे ठरविण्यात आले. 

सिंचनासाठी तसेच बिगर सिंचनासाठी प्रस्ताव
या योजनेमध्ये कोळकेवाडी धरणातून उपलब्ध होणाऱ्या ६५.५ अब्ज घन फूट पाण्यापैकी ५० अ.घ.फू. उत्तरेकडे कुंडलिका,पाताळगंगा, उल्हास खोऱ्यात, तर उर्वरित १७.५ अ.घ.फूट पाणी दक्षिणेकडे शास्त्री, मुचकुंदी, कोदवली खोऱ्यात सिंचनासाठी तसेच बिगरसिंचनासाठी वापरणे प्रस्तावित केले आहे.

Web Title: Appointment of company to study the use of water after the production of electricity