esakal | सुधीर पुराणिक यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

सुधीर पुराणिक

सुधीर पुराणिक यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्ती

sakal_logo
By
अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : पालीतील शेठ जे. एन. पालिवाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुधीर पुराणिक यांची बुधवारी (ता.13) मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी पुराणिक यांची कुलसचिव पदी नियुक्ती केली आहे. तर मानव संसाधन विकास कक्षाचे उपकुलसचिव डॉ. अशोक फर्डे यांनी नियुक्ती पत्र दिले. प्रा. पुराणिक हे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक देखील आहेत. या माध्यमातून त्यांनी असंख्य उपक्रम राबविले आहेत. कोरोनाकाळात रक्तदान उपक्रमाद्वारे हजारो रक्त पिशव्यांचे संकलन देखील केले आहे.

loading image
go to top