सावंतवाडीतील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी साकारणार मत्स्यालय 

सावंतवाडीतील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी साकारणार मत्स्यालय 

सावंतवाडी - येथील पालिकेच्या माध्यमातून नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी 25 कोटी रुपये खर्चून बीओटी तत्त्वावर मत्स्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

बेरोजगारांसाठी आपण केलेल्या लढ्याला यश आले असून, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडीत तब्बल अडीच हजार कंपन्यांचा समावेश असलेली प्रशिक्षण ऍकॅडमी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून दीड हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातील 70 टक्के युवकांना रोजगार मिळेल, असा दावा साळगावकर यांनी केला. 

पालिकेची मासिक सभा आज आज येथे झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत साळगावकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ""शहराचा विकास होण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात रस्ते विकासासाठी तब्बल पाच कोटी रुपये पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शहरासाठी दिले आहेत. शहराच्या नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 25 कोटी रुपये खर्चून खासगी कंपनीच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात शोभिवंत मासे गुहेतून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तीन एकर जागेत हा प्रकल्प साकारणार आहे. यासाठी दोन कंपन्यांशी बोलणीही झाली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करता येऊ शकतो.'' 

ते म्हणाले, ""मी बेरोजगारांसाठी लढा उभा केला. त्याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी शहरात कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री या केंद्र सरकारच्या संस्थे मार्फत मल्टी स्किल इन्स्टिट्यूट व मॉडेल करिअर सेंटर उभारण्याची तयारी दर्शवली आहे. या सेंटरच्या माध्यमातून तब्बल दीड हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातील 70 टक्के युवकांना नोकऱ्या दिल्या जातील. समाज मंदिरच्या बाजुला असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात या संस्थेसाठी जागा देण्यात येणार आहे. त्याचा फायदा येथील तरुणांना होणार आहे.'' 

पर्यटन वृद्धीला फायदा 
सावंतवाडी पर्यटन शहर असूनही येथे पर्यटक दिर्घकाळ थांबत नाहीत. याचा परिणाम म्हणून पर्यटनातून येथे आर्थिक उलाढाल होण्याचे प्रमाण कमी आहे. मत्स्यालयासारखा प्रकल्प यशस्वीरित्या साकारल्यास पर्यटनवृद्धीला फायदा होणार आहे. 

आचारसंहितेआधी कामे मर्गी 
साळगावकर म्हणाले, ""आचारसंहिता लागणार असल्यामुळे आज झालेल्या पालिकेच्या सभेत अनेक विकासकामांवर चर्चा करण्यात आली व अनेक कामांना मंजुरी देण्यात आली.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com