रसायनीत वायुगळती होऊन जवळपास 40 माकडांचा मृत्यू

लक्ष्मण डुबे
शनिवार, 15 डिसेंबर 2018

रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर आज वनविभाग व प्रदूषण नियंत्रण  मंडळ अधिकारी यांनी एचओसी व इस्त्रो अधिका-यांची कार्यालयात चौकशी केली. 

रसायनी (रायगड)- रसायनी येथील इस्त्रो कंपनीत गुरुवार ( ता. 13 ) रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. यामध्ये माकडं आणि कबूतरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर आज वनविभाग व प्रदूषण नियंत्रण  मंडळ अधिकारी यांनी एचओसी व इस्त्रो अधिका-यांची कार्यालयात चौकशी केली. 

रसायनीतील एचओसीएल कंपनी बंद झाली आहे. कंपनीतील सुरू असलेले संयंत्र सीएनए इस्त्रो कंपनीने घेतले आहे. या संयंत्रात नायट्रीक  अॅसीड मधुन वायुगळती झाली. वायुगळतीमुळे कंपनीतील माकड आणि कबूतर मेले असल्याचे कंत्राटी कामगार नवनाथ विटकर व नागरिकांनी सांगितले. मेलेली माकड मातीत गाडुन टाकले आहे, असेही सांगितले. वनविभाचे व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुपारी दोन वाजता घटना स्थळी गेले सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुन्हा प्रवेशव्दारा आले नाही त्यामुळे आधिकृत माहिती मिळाली नाही. तर घटनास्थळी जाण्यासाठी पत्रकारांना रोखण्यात आले. वनविभागाचे सोनवणे  व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन देसाई यांच्याशी अनेकदा मोबाइलवर संपर्क साधला असता मात्र होऊ शकला नाही. तर आधिकृत माहिती देण्यासाठी सरकारी अधिकारी टाळाटाळ करत आहे. हे समोर आले आहे. 

दरम्यान, घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे, वनपाल आर के कांबळे, प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले आहे. यावेळी इस्रो युनिट इंनचार्ज राजेंद्र सोरटे आणि कंपनीचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Around 40 monkeys die due to chemical air pollution