कला माणसाला प्रगल्भ बनवते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

रत्नागिरी- "चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना व शाळांना मार्गदर्शन करताना कला ही माणसाला प्रगल्भ बनवत असते. जीवनानुभव घ्यायला शिकवते, पाठ्यपुस्तकाबरोबर चित्रकला विद्यार्थ्याच्या सृजनशिलतेचा विकास होतो असे मत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी व्यक्त केले. 

रा. भा. शिर्के हायस्कूलच्या रंजन मंदिरमध्ये चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी फिनोलेक्‍स कॉलेजचे प्राचार्य एस. एस. गोईलकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी र. ए. सोसायटीचा ऍड. बाबासाहेब नानल गुरुकुल प्रकल्प नेहमीच कार्यशील असतो. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा विकास व्हावा, या हेतूने दरवर्षीप्रमाणे गुरुकुल प्रकल्पातर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात तब्बल 600 विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच यशस्वी शाळांचा सत्कार झाला. 

Web Title: Art makes profound man