आमदारांवर टीका केलीच कशी? ः रावराणे

 Arvind Ravrane's reply to Laxman Ravrane
Arvind Ravrane's reply to Laxman Ravrane

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - मतदारसंघातील विकासकामांच्या धडाक्‍यामुळेच आमदार नीतेश राणे दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेचे प्रश्‍न न सोडविणाऱ्या माजी सभापती लक्ष्मण रावराणे यांना आमदारांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका पंचायत समितीचे सदस्य अरविंद रावराणे यांनी केली. 

कणकवलीचे सुरेश सावंत यांनी आमदार राणेंकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशा मागणीचे निवेदन दिले होते. त्या निवेदनावरून माजी सभापती तथा पंचायत समितीचे सदस्य रावराणे यांनी, ज्यांना ऊस उत्पादक समस्या माहिती नाहीत, त्यांच्याकडे निवेदन देऊन उपयोग काय? असा प्रश्‍न उपस्थित करीत टीका केली होती. या टीकेला आज सदस्य रावराणे यांनी उत्तर दिले.

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की श्री. रावराणे हे सभापती असताना त्यांच्याकडे अनेक नागरिक तक्रारी घेऊन येत असत. सभापती या नात्याने त्यांनी त्या समस्या सोडविणे आवश्‍यक होत्या; परंतु त्या सोडविताना ते केवळ "देव तेका पाहून घेईल' एवढेच वाक्‍य बोलून विषय सोडून द्यायचे. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी तालुक्‍यातील एकही प्रश्‍न सोडविला नाही. ज्यांना एक प्रश्‍न सोडविता आला नाही, त्यांनी आमदार राणेंवर टीका करणे म्हणजे त्यांची वैचारिक दिवाळखोरी म्हणावी लागेल. 

पडद्यामागून राजकारण 
आमदार श्री. राणे हे प्रगतिशील शेतकरी आहेत. नापणे येथे त्यांची ऊस शेती आहे; परंतु रावराणे यांना गुऱ्हाळाची तरी माहिती आहे का? रावराणे यांना मराठीही नीट बोलता येत नाही. एवढेच नव्हे तर अडीच वर्षे सभापती राहिल्यावर ठरावाला अनुमोदन लागते, हेही त्यांना माहीत नाही. आमदार राणेंवर त्यांनी जरी टीका केली असली तरी त्यांचा बोलविता धनी कोण? हे आम्हाला माहिती आहे. पडद्यामागून राजकारण सुरू आहे, असा दावा त्यांनी केला. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com