आशा वर्कर्स यूनियनचे सिंधुदुर्गात जेलभरो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सिंधुदुर्गनगरी - आशा व गटप्रवर्तकांना सेवेत कायम करा, आशांना तिप्पट मोबदला व गटप्रवर्तकांना किमान 3000 मानधनवाढ मिळालीच पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ओरोस येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. 

आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा शासकीय निर्णय होईपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. तर आज सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने युनियनच्या सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओरोस छत्रपती शिवाजी पुतळा येथे जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या आंदोलनात आंदोलनकर्त्या आशा कर्मचाऱ्यांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न करताच ओरोस पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले. आशा वर्कर्स यूनियनच्यावतीने करण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनातून तीनशेहून अधिक सहभागी आंदोलनकर्त्यांना ओरोस पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले. 

आज आशा वर्कर्स यूनियनच्यावतीने करण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनात तीनशेहू अधिक सहभागी आंदोलनकर्त्यांना ओरोस पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना समज देवून सोडण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asha Workers Union agitation in Sindhudurg