'मोदी म्हणातात चाय, योगी म्हणतात गाय आणि जनता म्हणतेय बाय'

वृत्तसंस्था
बुधवार, 23 जानेवारी 2019

मोदी म्हणातात चाय चाय, योगी म्हणतात गाय गाय आणि आता देशातील जनता भाजपला म्हणतेय बाय बाय अशी बोचरी टिका काँग्रसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज महाड येथे केली.

महाड- मोदी म्हणातात चाय चाय, योगी म्हणतात गाय गाय आणि आता देशातील जनता भाजपला म्हणतेय बाय बाय अशी बोचरी टिका काँग्रसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज महाड येथे केली.

केंद्र सरकारच्या अपयशी कारभाराचा निषेध करत काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा आज महाडमध्ये दाखल झाली त्यावेळी आझाद मैदानावर आयोजित सभेत अशोक चव्हाण बोलत होते.यावेळी खा.हुसेन दलवाई,आ.भाई जगताप,माजी मंत्री नसिम खान,माजी आमदार माणिक जगताप,प्रभारी बी.एन,संदीप,रायगड जिल्हा अध्यक्ष आर.सी.घरत.महिला जिल्हा अघ्यक्ष श्रध्दा ठाकूर उपस्थित होते.

अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर टिका करतांना म.गांधींचा चष्मा दाखवून देश स्वच्छ होत नाहीत त्यासाठी मने स्वच्छ पाहिजेत.शेतक-यांचे खोटे फोटो लाभार्थी म्हणून दाखवणारे शेतक-यांची कर्जमाफी करु शकत नाही,केवळ काँग्रेसच कर्जमाफा करु शकते हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. राज्य व केंद्रातील फसव्या घोषणांना जनतेने भूलू नये.काँग्रसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त सरकारच जनतेला हवे असल्याचे मुकत्याच झालेल्या विधानसभेत जनतेने दाखवले असल्याचे ते म्हणाले.जलयुक्त शिवार नावाने झोलयुक्त शिवार करणाऱ्या व अच्छे दिन आयेंगे म्हणणा-या सरकारला आता आपा कब जायेंगे असे विचारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.माणिक जगताप यांनी आता कोकणची धूरा हातात घ्यावी असेही ते म्हणाले.यावेळी नोटाबंदी.गँस दरवाढ,कर्जमाफी असे नेहमीचे मुद्देही भाषणात आले.

माणिक जगताप यांनी युती सरकारवर टिका करत ग्रामीण भागातील विकास खुंटल्याचे सांगितले.दलित व मुस्लिमांचा भाजपसेना शत्रू असल्याचा आरोपही त्यांनी केला.यावेळी जनसंघर्ष यात्रा छ.शिवाजी चौक व चवदार तळे येथे आली तेथे अशोक चव्हाण व उपस्थितांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज व डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Web Title: Ashok Chavan Criticise On narendra Modi and Yogi aditynath in Jansangharsh Rally