अशोक वालम पुन्हा शिवसेनेसोबत

अशोक वालम पुन्हा शिवसेनेसोबत

रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांची मते जाणून घेण्यासाठी आलेल्या सुकथनकर समितीला शिवसेना आणि प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने गाशा गुंडाळायला लावला, मात्र या धामधूमीत सेनेने आणखी एक धक्का दिला.

एकेकाळचे सख्खे वैरी बनलेले राजापूरचे आमदार राजन साळवी आणि संघर्ष समितीचे नेते अशोक वालम एकत्रित होते. सेनेच्या गोटात त्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी लोकसभा निडणुकीतील हे वेगळे संकेत असून, सेना या भागात आणखी भक्कम करण्याची ही चाल मानली जात आहे.  

रिफायनरीविरोधातील दोन्ही संघटना एकत्र आल्याने विरोधाची धार आणखी वाढली आहे. रिफायनरीला स्थानिकांनी सुरवातीपासूनच तीव्र विरोध दर्शविला तो अजून कायम आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध तरी उद्योगमंत्री देसाई यांनी प्रकल्पाची अधिसूचना काढली. सेनेच्या या दुटप्पी धोरणामुळे अशोक वालम यांनी वेगळी चूल मांडत विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सेनेला नेहमी टार्गेट केले. विरोधात पत्रकार परिषदा झाल्या.

यातूनच राजन साळवी आणि अशोक वालम यांच्यात दरी पडली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहिल्या. मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या प्रकल्पविरोधी आंदोलनात सेनेवर टीकेचे आसूड ओढले. तेव्हा सेनेने हा लढा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. विरोधकांमध्ये दोन गट पडले. सुकथनकर समितीच्या दौऱ्यात वेगळे चित्र दिसले. शिवसेनेने समितीच्या वैधतेवर प्रहार करीत समितीचे कामकाज थांबविले तेव्हा वालम सेनेसोबत होते. 

वायकर यांचे खंदे समर्थक
अशोक वालम यांना प्रकाशझोतात शिवसेनेनेच आणले. पालकमंत्री रवींद्र वायकर यांचे ते खंदे समर्थक. रिफायनरीनंतर ते आणखी पटलावर आले. मधल्या कालावधीमध्ये गायब झालेले वालम खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, राजन साळवी, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह ते येथील अल्पबचत सभागृहात दाखल झाले. त्यांच्यासोबत संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या पाठिंब्याने पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com