पालीतील जेष्ठ भाजप कार्यकर्ते विजय धारीयांना लाभला अटलबिहारी वाजपेयींचा सहवास

अमित गवळे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पाली - दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहवास लाभलेले पालीतील ७५ वर्षीय भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते यांनी वाजपेयींच्या सोनेरी आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी हे १९८५ साली रायगड जिल्ह्यातील रोहा येथे दौर्‍यावर आले असतांना धारीया यांना त्यांचा सहवास लाभला.

पाली - दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहवास लाभलेले पालीतील ७५ वर्षीय भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते यांनी वाजपेयींच्या सोनेरी आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी हे १९८५ साली रायगड जिल्ह्यातील रोहा येथे दौर्‍यावर आले असतांना धारीया यांना त्यांचा सहवास लाभला.

धारीया काकांनी डबडबलेल्या डोळ्यांनी अतिशय भावुक होऊन अापले अनुभव कथक केले. सुधागड तालुका भा.ज.पा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अटलजींच्या देशसेवेचा वसा घेवून दि.बा. ढेरे यांच्या नेतृत्वाखाली कमाला सुवात केली. योगायोगाने १९८५ साली अटलजींचा वाढदिवस साजरा करण्याचे जिल्ह्यात ठरले. यावेळी भा.ज.पाचे कार्यकर्ते चंद्रकांत घोसाळकर, अरुण गुरव, भाऊ भिडे अशा अनेक कार्यकर्त्यांनी निधी गोळा केला. हा निधी रोह्यातील कार्यक्रमात त्यांना देण्याचा सुवर्ण योग आला हे माझे भाग्य.

अटलबिहारी वाजपेयी रायगडात येणार ही बातमी आली. भा.ज.पा व संघकार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह संचारला. सुधागड तालुका प्रमुख या नात्याने साहेबांचा सत्कार केला. राष्ट्राच्या चरणी समर्पीत असलेल्या या उत्तुंग व्यक्तीमत्वाला जवळून पाहण्याची त्यांचा सत्कार करण्याची तसेच पाठिवर शाबासकीची थाप घेण्याची संधी लाभली जिवनाचे सार्थक झाले असे ज्येष्ट कार्यकर्ते विजय धारीया यांनी सांगितले. त्यावेळी वाजपेयी यांच्या राहण्याची अलिशान व्यवस्था एका कंपनीने केली होती. मात्र तिथे न राहता एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी राहणेच त्यांनी पसंत केले. इतके साधे व सत्वशिल व्यक्तीमत्व म्हणून ते जिवन जगले. राष्ट्रप्रेम हीच त्यांची जिवनप्रेरणा व जिवन उद्दिष्ट होते. त्यांची भाषणे मला प्रेरणादायी होती. त्यांनी त्यावेळी केलेल्या मार्गदर्शनातून आम्ही खर्‍या अर्थाने घडलो. त्यांनी प्रधानमंत्री व्हावे ही माझी अतोनात इच्छा होती. ते प्रधानमंत्री झाले याचा प्रचंड आनंद झाला. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत वाजपेयी यांना भेटण्याची बोलण्याची तीनदा संधी मिळाली. त्यांच्या जिवनातून प्रचंड प्रेरणा व उर्जा मिळाली. लालकिल्ल्यावर लोकहितार्थ आंदोलनासाठी गेलो असता या आंदोलनाच्या समयी देखिल वाजपेयी यांचे दर्शन झाले असल्याच्या आठवणी देखिल विजय धारीया यांनी सांगितल्या. आणि अटलबिहारी वाजपेयी यांना शाश्रूनयनांनी आदरांजली अर्पण केली.

Web Title: Atal Bihari Vajpayee's association with senior BJP leader Vijay Dhariya