esakal | एटीएम मशीनचे लॉकर उघडे राहिले आणि...

बोलून बातमी शोधा

Atm center problem in banda

शहरातील कट्टा कॉर्नर येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याच्या अफवेने आज शहरात खळबळ उडाली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले; मात्र संबंधित पैसे भरणाऱ्या एजन्सीच्या दुर्लक्षामुळे एटीएमचे लॉकर उघडे राहिल्याचे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे चोरी झाली नसल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला.

एटीएम मशीनचे लॉकर उघडे राहिले आणि...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) - शहरातील कट्टा कॉर्नर येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडल्याच्या अफवेने आज शहरात खळबळ उडाली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले; मात्र संबंधित पैसे भरणाऱ्या एजन्सीच्या दुर्लक्षामुळे एटीएमचे लॉकर उघडे राहिल्याचे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे चोरी झाली नसल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला. 

बॅंकेचे एटीएम मशीन अन्यत्र पाठविल्याने एटीएममधील रोकड काल (ता.6) संध्याकाळीच काढण्यात आली होती. एटीएम रोकड अभावी बंद असल्याची कोणतीही सुचना एटीएम सेंटरबाहेर लावण्यात आली नव्हती. कॅश लॉकरही उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये सकाळीच घबराट पसरली. त्यामुळे साहजिकच एटीएम फोडल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. याची कल्पना ग्राहकांनी स्थानिक पोलिसांना दिली.

येथील पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी बोलविले. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता एटीएममध्ये रोकड नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच संबंधित एजन्सीच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला