किशोर मर्गजांवर हल्ल्याचा प्रयत्न

Konkan
Konkan

कुडाळ : येथील पंचायत समितीचे सदस्य किशोर मर्गज यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोरांनी त्यांची गाडी फोडली. कॉंग्रेसकडून जिल्हा परिषद उमेदवारीच्या चढाओढीतून हा प्रकार घडल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवक कॉंग्रेसचे लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष आनंद शिरवलकर (रा. कुडाळ) यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. हा प्रकार आज पहाटे घडला.


श्री. मर्गज सलग पंधरा वर्षे पंचायत समितीचे सदस्य आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की 27 नोव्हेंबरला कॉंग्रेसचे पदाधिकारी शिरवलकर यांनी आपल्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत वेताळबांबर्डे मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी निश्‍चित झाला आहे.

तेथून लढण्यास आपण इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. तेथून आपल्याला उमेदवारी देण्याचेही निश्‍चित झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावर आपण या मतदारसंघात येणाऱ्या आवळेगाव पंचायत समितीचा विद्यमान सदस्य असल्याने आपल्यालाच उमेदवारी मिळायला पाहिजे, असे सांगून आपण फोन बंद केला. त्याच रात्री 10.20 वाजता पुन्हा मोबाइलवर फोन आला, तो आपल्या मुलीने उचलला. तिच्याशी उद्धट भाषेत बोलल्याने घाबरून तो फोन तिने आपल्या आईकडे दिला. या वेळी शिरवलकर यांनी असभ्य भाषेत त्यांना धमकावले.


यानंतर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आपण टीव्ही बघत असतांना पत्नी व मुलीने घाबरत हा प्रकार आपल्याला सांगितला. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास आपल्या घराच्या दर्शनी भागात दरवाजाबाहेर असलेल्या लोखंडी शटरवर कोणीतरी जोरजोरात लाथा मारत असल्याचे ऐकू आले. आपण घरातील खिडकीतून बाहेर पाहिले असता श्री. शिरवलकर व अन्य काहीजण आपल्याला जोरजोराने हाक मारून बाहेर बोलावत असल्याचे दिसले. त्यातील दोघा-तिघांकडे लोखंडी रॉड होता. "बाहेर ये, तुला व तुझ्या कुटुंबाला संपवतो' अशी धमकी ते देत होते. भीतीमुळे आपण बाहेर गेलो नाही. त्यानंतर ते परत गेले. जाताना "तुला बघून घेतो. तुझी गाडी फोडून टाकतो' अशी धमकी दिली. खाली जाऊन त्यांनी आपल्या मोटारीच्या (एमएच07- क्‍यू- 7950) काचा फोडल्या.
दरम्यान, या तक्रारीनंतर येथील पोलिसांनी श्री. शिरवलकर यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गवस आणि श्री. पडेलकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com