माडखोलात एकावर पाळकोयत्याने हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

सावंतवाडी - आर्थिक देवघेवीवरुन बदनामी केल्याच्या रागात माडखोल येथे एकावर पाळकोयत्याने हल्ला करण्यात आला. विजय भालेकर (रा. माडखोल बेबीवाडी) असे त्याचे नाव असून याप्रकरणी हल्ला करणाऱ्या उल्हास राणे याच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर मात्र तो फरारी झाल्याचे ठाणे अमलदार मंगेश शिंगाडे यांनी सांगितले.

यातील भालेकर याचा बांबूचा व्यवसाय आहे. यात राणे याची भागीदार आहे दरम्यान बाबू व्यवसायात एकाचे पैसे देण्यावरून झालेल्या वादातून गुरुवारी सकाळी धवडकी बस स्टॉप येथे उल्हास राणे यांनी विजय भालेकर यांनी पाळकोयत्याने हल्ला केला यात भालेकर याच्या डोक्‍याला दुखापत झाली. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, याबाबतची भालेकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Attack in Madkhola