पैसे वसुलीच्या सुपारीच्या वादातून मालवणात हल्ला 

पैसे वसुलीच्या सुपारीच्या वादातून मालवणात हल्ला 

मालवण - जमीन विक्रीतील पैशाच्या वसुलीसाठी दिलेल्या सुपारीच्या वादातून काल रात्री दांडी (ता. मालवण) येथे दिनेश दत्ताराम साळकर (रा. वायरी-गावकरवाडा) याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. त्यात तो जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करीत मालवण दांडी येथील शुभम संतोष जुवाटकर, राजेश खडपे याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, की शुभमने बिअरची बाटली फोडून साळकरच्या डोक्‍यात मारली. यातून सुटका करून घेत पळून जाणाऱ्या साळकरला पकडून पिस्तुल रोखत जुवाटकरने चाकूचे वार केले आणि ठार मारण्याची धमकी दिली. 

मालवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः तालुक्‍यातील हडी साळकरवाडीचा साळकर व्यवसायानिमित्त कुटुंबासमवेत वायरी गावकरवाडा येथे राहतो. दिनेशची कोल्हापूर जिल्ह्यात वाठार (ता. हातकणंगले) येथे एक एकर जमीन आहे. जमिनीच्या विक्रीसंदर्भात फेब्रुवारी 2018 मध्ये तानाजी भंडारी (रा. वाठार) यांच्याबरोबर करारपत्र झाले होते; परंतु व्यवहारातील दोन लाख रुपये न मिळाल्याने साळकरने दांडी येथील खडपेला त्याची माहिती दिली. वसुलीसाठी खडपेतर्फे जुवाटकरने (रा. दांडी मालवण) सुपारी घेतली होती. 

काल रात्री साडेआठच्या सुमारास खडपेने साळकरला फोन करून वायरी येथील एका बिअरशॉपजवळ बोलाविले. त्यानंतर साळकर तेथे गेला. खडपेसोबत त्याचे भाऊ आणि जुवाटकर हे होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यातून राजेश व त्याच्या भावाने साळकरला पकडून ठेवले. जुवाटकरने पिस्तुल काढून तानाजी भंडारीला दिलेल्या धमकीच्या बदल्यातील पैसे आता दे, नाहीतर याच पिस्तूलाने ठार मारून टाकेन, अशी धमकी दिली. साळकरच्या डाव्या कानशीलाला पिस्तुल लावत जुवाटकरने डाव्या हाताने बिअरची बाटली फोडून ती साळकरच्या डोक्‍यात मारली. भयभीत साळकर हा जीव मुठीत घेऊन पळून लागला. त्याला पुन्हा पकडत जुवाटकरने चाकूने हल्ला केला. याबाबत साळकरने फिर्याद दिली. त्यानुसार संशयित जुवाटकर, राजेश खडपे आणि त्याचा भावाविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी जुवाटकर, खडपेला अटक केली आहे. 

मुंबईतून तडीपार 
पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सांगितले, की जुवाटकर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला आहे. त्याच्यावर मुंबई येथे मारहाण, धमकी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तेथून तो मुंबई तडीपार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com