सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेकडून कर्जवसुली हे धक्‍कादायक 

Atul Kalsekar Comment On Loan Collection From Sindhudurg District Bank
Atul Kalsekar Comment On Loan Collection From Sindhudurg District Bank

कणकवली ( सिंधुदुर्ग) - राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. अशाही परिस्थिती जिल्हा बॅंकेचे काही अधिकारी, कर्मचारी काही कर्जदारांकडून सक्तीने कर्जवसुली करत असल्याचे वृत्त आहे. ही बाब धक्‍कादायक असून सक्तीची कर्जवसुली थांबविण्यासाठी यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी म्हटले आहे. 

श्री. काळसेकर यांनी पत्रकात म्हटले की, जिल्हा बॅंक ही शेतकरी, मच्छिमार, असंघटित कामगार अशा सर्वसामान्य लोकांच्या योगदानातून उभी राहिली आहे. सिंधुदुर्गवासीयांमध्ये जाणीवपूर्वक कर्ज बुडविण्याची प्रवृत्ती नाही. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात, जिल्हा बॅंकेने अडचणीच्या वेळी कर्जदारांच्या ठामपणे उभे राहिलेच पाहिजे. कोरोना व्हायरसच्या संकटाचे भयावह सावट जिथे अख्ख्या जगावर पडलेले आहे, तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगळा न्याय लावता येणार नाही. सर्वच क्षेत्रात आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झालेले आहेत. अशा परिस्थितीत बॅंकेच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी कर्जदाराला वेठीस धरणे, हे केंद्र व राज्य शासनाने अवलंबलेल्या धोरणाशी पूर्णतः विसंगत ठरणारे आहे. 

त्यांनी पुढे नमुद केले आहे की, कोरोना महामारीवरील महत्वाचा उपाय असलेल्या सोशल डीस्टंसिंगच्या तत्त्वालाच अशा प्रकारच्या कर्ज वसुलीमुळे तडा जात आहे. म्हणूनच, लॉकडाऊनचा निर्णय केंद्र व राज्य सरकारनेच घोषित केलेला असताना जिल्हा बॅंकेने थकीत कर्जाच्या हप्त्यांची वसुली करणे हे नैतिकता व माणुसकीला धरून असणारे नाही. जिल्हा बॅंकेच्या 28 विकास अधिकाऱ्यांना वसुलीसाठी कोणाच्याही घरी जाऊ नये, असे आदेश बॅंकेने यापूर्वीच दिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन जनतेला केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅंकेने देखील काही निर्णय जाहीर केले.

त्यानुसार पुढील तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय, सहकारी व खासगी बॅंका, खासगी वित्तसंस्था आदी सर्वांनाच वसुलीवर निर्बंध लावत कर्जदारांना धीर दिला आहे. सर्वच अग्रगण्य बॅंका याचे पालन करत असताना, जिल्हा बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार वर्ग यांच्या घरी जात सक्तीने कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे जे वृत्त येत आहे, ते अत्यंत धक्कादायक व दुःख देणारे आहे. त्यासंदर्भात अडचणीतल्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी बॅंकेला त्यांच्या पाठीशी रहायला आपण भाग पाडणार आहोत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com