मुंबई गोवा महामार्गावर पाण्यात रिक्षा घसरली अन्...

Auto Rickshaw Accident Near Belane Driver Dead Sindhudurg Marathi News
Auto Rickshaw Accident Near Belane Driver Dead Sindhudurg Marathi News

नांदगाव ( सिंधुदुर्ग ) - बेळणे येथे अपघातात जखमी झालेले असलदे उगवतेवाडी येथील ब्राम्हणदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस व रिक्षा व्यावसायिक संतोष आप्पाजी जेठे (वय 50) यांचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. निधनाचे वृत्त समजताच नांदगाव पंचक्रोशीवर शोककळा पसरली. 

याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावर बेळणे हॉटेल आशिषसमोर रत्यावर आलेल्या पाण्यात रिक्षा स्लिप होऊन काल (ता.16) दुपारी अपघात झाला होता. यात चालक संतोष आप्पाजी जेठे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहाटे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. अखेर 7 वाजता त्यांचा मृत्यू झाला. 

संतोष जेठे कणकवली तालुका पत्रकार संघाचे सदस्य होते. सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असायचे. रिक्षा व्यवसाय असल्याने नांदगाव पंचक्रोशीत त्यांचा मोठा मित्र परिवार होता. निधनाची बातमी समताच नांदगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. रिक्षा संघटनेच्या वतीने बंद पाळण्यात आला.

असलदे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. अंत्यसस्काराला माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर, प्रकाश परब व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. 

दरम्यान मुंबई गोवा महामार्ग काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग मध्यभागी ठेवण्यात आले. त्या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर पाणी जात आहे. त्यातच खचलेला रस्ता हॉटेल आशिषसमोर असल्याने रिक्षाचा अपघात घडला. या अपघाताला महामार्ग ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप सरपंच गुरुप्रसाद वायंगणकर यांनी केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com