अजब ! कुत्र्यांपासून बचावासाठी बिबट्या झाडावर  ( व्हिडिओ )

Avoid Dogs Attack Leopard Climbs On Tree Sindhudurg News
Avoid Dogs Attack Leopard Climbs On Tree Sindhudurg News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कारीवडे गवळीवाडी येथे भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्याला चक्क दहा पंधरा कुत्र्यांनी घेरल्याने दुसऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेल्या बिबट्याला स्वतःचा जीव वाचविण्यासाठी चक्क 25 फुट माडावर चढून लपावे लागले. हा थक्क करणारा प्रकार आज पहाटे पहाटे ग्रामस्थांना अनुभवता आला. 

भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याने भक्ष्याच्या शोधात चक्क कारीवडे गवळीवाडीतील भरवस्तीत शिरला; मात्र दहा ते पंधरा कुत्र्यांच्या कळपात समोर त्याचा निभाव लागला नाही. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने अखेर बिथरलेल्या बिबट्याने लक्ष्मण भालेकर यांच्या घरा शेजारील नारळाच्या झाडाचा आधार घेतला. बिबट्या चढलेल्या झाडाखाली कुत्र्याच्या कळपाने ठाण मांडल्याने त्याने खाली उतरण्याचे धाडस केले नाही; मात्र कुत्र्यांचे भुंकणे जोर जोरात चालू राहिल्याने घर मालकाने बाहेर येऊन पाहिले असता ते दृश्‍य त्यांच्या नजरेस पडले. याबाबतची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. 

अन्‌ जंगलात ठोकली धुम 

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुत्र्यांना तेथुन हुसकावून लावले. त्यानंतर झाडाला काठी लावून बिबट्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केला. बिथरलेला बिबट्या काही केल्या खाली यायला पाहत नव्हता अखेर अथक प्रयत्नाने बिबट्याने अर्ध्यावरून खाली उडी मारुन जंगलाच्या दिशेने धुम ठोकली; मात्र हा थक्क करणारा प्रकार सुमारे तासभर लोकांना अनुभवता आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com