सावंतवाडीची पत्रकारिता आदर्शवत ः केसरकर

award ceremony sawantwadi konkan sindhudurg
award ceremony sawantwadi konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग)- तालुका पत्रकार संघातील प्रत्येक पत्रकारा हा माझ्या कुटुंबातील सदस्यासारखा असून नेहमीच तालुक्‍यातील पत्रकारांनी लेखणीतून आपले वेगळेपण दाखविले आहे. सावंतवाडीची पत्रकारीता ही आदर्शवत असल्याचे प्रतिपादन येथे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले. 

तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा आज येथील स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी येथे येथे पार पडला. जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बॅंक संचालक विकास सावंत, व्हिक्‍टर डान्टस, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे, अण्णा केसरकर, ऍड. अनिल निरवडेकर, सीमा मठकर, पत्रकार ऍड. संतोष सावंत, हरिश्‍चंद्र पवार, अभिमन्यू लोंढे, अशोक दळवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई आदी उपस्थित होते. 

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार "सकाळ'चे युवा पत्रकार भूषण आरोसकर यांना देण्यात आला. कै. चंदु वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार राजेश मोंडकर, बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार छायाचित्रकार जतिन भिसे, जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांना प्रदान करण्यात आला. 

पत्रकार संघाचे सचिव अमोल टेंबकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, पत्रकार सागर चव्हाण, मयूर चराठकर, हर्षवर्धन धारणकर, दीपक गावकर, प्रवीण मांजरेकर, उमेश सावंत, प्रसन्न राणे, अनंत जाधव, रूपेश हिराप, रोहन गावडे, निखिल माळकर, विनायक गावस, भक्ती पावसकर, प्रसन्ना गोंदावळे, योगिता बेळगावकर, भरत केसरकर, स्वप्नील उपरकर, साबाजी परब, सिद्धेश पुरळकर आदी उपस्थित होते. शुभम धुरी यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष विजय देसाई यांनी प्रास्ताविक केल. खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी आभार मानले. दरम्यान, आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त आरोसकर यांनी मनोगतात "सकाळ'बाबत ऋण व्यक्त केले. 

पत्रकारांच्या लेखणीमध्ये धार 
बबन साळगावकर म्हणाले, ""पत्रकारांच्या लेखणीमध्ये धार असून मोठमोठ्या आमदार-खासदारांना ही धास्ती भरण्यासारखेही निर्भीड लेखणी पत्रकार करू शकतात.'' आपल्या जीवनातील पत्रकारिता संबंधी दोन प्रसंग त्यांनी कथन केले. विकास सावंत यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून येथील पत्रकारांनी नेहमीच आदर्शवत काम केले आहे, असे मत व्यक्त केले. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com