पुरस्कारप्राप्त शिक्षकांना  दोन वेतनवाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

रत्नागिरी - राष्ट्रपती आणि राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ दिली जावी, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी सेवानिवृत्त शिक्षक नेते कृ. आ. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

रत्नागिरी - राष्ट्रपती आणि राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढ दिली जावी, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी सेवानिवृत्त शिक्षक नेते कृ. आ. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

शिक्षकांना मंजूर असणाऱ्या दोन वेतनवाढ देण्याची टाळाटाळ केली होती. त्यासाठी राज्यातील शिक्षकांचे ज्येष्ठ नेते कृ. आ. पाटील यांनी शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुंबई उच्च न्यायालयात राज्यातील शिक्षकांतर्फे दाद मागण्यात आली. त्याचा निर्णय 2 डिसेंबर 2016 झाला. पुरस्कार जाहीर झालेल्या दिनांकापासून सहा आठवड्यांच्या आत देण्याचा निवाडा केला आहे. त्यानंतर प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला शासनाने तसा आदेशही काढला आहे.

शासनस्तरावर वेतनवाढी देण्याचे आदेश व्हावेत म्हणून कृती समितीने शासनाकडे आग्रह धरला होता. त्यानुसार राज्यातील हजारावर शिक्षकांना लाभ मिळणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे विरोधी पक्षनेते असताना अनेक शिक्षकांना अभिनंदनाची पत्रे पाठवत होते; मात्र प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून टाळाटाळ झाली. स्वातंत्र्यानंतरच्या भारत सरकारची दोन वेतनवाढीची तरतूद बदलून देणाऱ्या बुजुर्ग शिक्षकांच्या सेवेची बोळवण केल्याची खंत पाटील यांनी व्यक्‍त केली. 

Web Title: award winning teachers will get two increment