पाली - अंनिसतर्फे म्हासडी शाळेत सर्प प्रबोधन

अमित गवळे
बुधवार, 4 जुलै 2018

पाली (रायगड) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पाली शाखेतर्फे नुकतेच रोहा तालुक्यातील म्हसाडी येथील कुणबी समाज विद्यालयात सर्प प्रबोधन कार्यक्रम झाला. यावेळी विवीध सापांविषयी माहिती देऊन त्यांच्या बद्दल असलेल्या अंधश्रद्धा व गैरसमज दुर करण्यात आले.

यावेळी विषारी, निमविषारी व बिनविषारी अशा विविध सापांविषयी माहिती देण्यात आली. तसेच सापांचे प्रकार सांगून चित्रात्मक माहिती दिली गेली. साप डुग धरतो का? सापाला नागमणी असतो का? साप दूध पितो का? साप गारुडयाच्या पुंगीच्या तालावर कसा डोलतो? विद्यार्थ्यांच्या अशा विविध प्रश्नांची शास्त्रशुद्ध माहिती अंनिस शाखा पालीचे प्रधान सचिव अमित निंबाळक यांनी दिली. 

उपस्थितांचे सापांबद्दलचे गैरसमज व अंधश्रद्धा दूर केल्या. या कार्यक्रमास अमित निंबाळकर यांना शेखर पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भांडवलकर सर, म्हात्रे सर, माने सर, जाधव सर ,निमण मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: awareness about snake in mhasadi school from andha shraddha nirmulan