भाषणात मोठी ताकद आहे.. : बबन साळगांवकर

अमोल टेंबकर
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सावंतवाडी : भाषणात मोठी ताकद आहे त्याच वक्तृत्वाचा फायदा घेऊन तब्बल 23 दिवसांत माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदा आमदार बनले आणि त्यांनी नंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. आज ही त्यांची विधानसभेतील भाषणे संदर्भासाठी ऐकली जातात असे सांगून सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आठवणींना उजाळा दिला. 

येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा सह्याद्री फांउडेशनचे अध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज येथील गवाणकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते 

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल राउळ,पंचायत समिती सभापती रवी मडगावकर,विभावरी सुकी,अण्णा केसरकर,संतोष सावंत,महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस आदी उपस्थित होते 

यावेळी साळगावकर म्हणाले वक्तृत्वात जादू असते समोर असलेल्या असंख्य लोकांना खिळवून ठेवण्याची ताकद असते. त्यामुळे वकृत्वावर आपले प्रभुत्व असणे गरजेचे आहे. बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या अनेक नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोक आतुरलेले असायचे आणि गर्दी करायचे ही आज ही वस्तूस्थिती आहे.

नारायण राणे यांचे वक्तृत्वावर मोठी छाप आहे आणि त्याचाच फायदा घेऊन ते फक्त 23 दिवसांत आमदार बनले आणि त्यानंतर त्यांनी आपली मजल थेट मुख्यमंत्रीपदापर्यत मारली. आज ही विधानसभेतील त्यांची भाषणे म्हणून ऐकली जातात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यातन असा मोठा वक्ता घडावा अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी परब म्हणाले, या ठिकाणी आता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता भविष्यात जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येईल आणि नवोदित विद्यार्थ्याना संधी देण्यात येईल 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत तर आभार श्री गवस यांनी मानले यावेळी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यानी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Baban Salgaonkar praises Narayan Rane's oratory skills