...अन् बबन साळगावकरांना अश्रूंचा बांध फुटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सावंतवाडी - राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाल्याने 3 ऑक्‍टोबरला ते आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. आज त्यांनी शहराच्या प्रलंबित विकासकामासंदर्भात घेतलेल्या पालिकेच्या आढावा बैठकीत तसे जाहीर केले. यावेळी साळगावकरांच्या निर्णयावर सर्व अधिकारी भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या या भावनिक प्रतिसादानंतर साळगावरांना रडू कोसळले. 

सावंतवाडी - राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाल्याने 3 ऑक्‍टोबरला ते आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. आज त्यांनी शहराच्या प्रलंबित विकासकामासंदर्भात घेतलेल्या पालिकेच्या आढावा बैठकीत तसे जाहीर केले. यावेळी साळगावकरांच्या निर्णयावर सर्व अधिकारी भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या या भावनिक प्रतिसादानंतर साळगावरांना रडू कोसळले. 

नगराध्यक्ष म्हणून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांनी सर्वांचे आभार मानले. श्री. साळगावकर यांनी राजीनामा देण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर पोटनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची नावे समोर येत आहेत. 

नगराध्यक्ष साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी फारकत घेताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून निवडणुक लढविण्याचे जाहीर केले होते. त्यांनी केसरकर यांच्यावर टीका करताना केसरकर यांचे राजकारण जादूवर चालत असल्याचे सांगितले होते. वेळ पडल्यास आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचेही बोलून दाखविले होते. एकूणच या सगळ्या पार्श्‍वभूमीवर श्री. साळगावकर यांनी नुकतीच जिल्हाध्यक्ष अमित सामंत व एम. के. गावडे यांच्यासह राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी पवार यांनी आपणाला उमेदवारी देण्याचे मान्य केले असून, कामाला लागण्याची सूचना केली, असे श्री. साळगावकर यांनी पत्रकांराशी संवाद साधताना सांगितले होते. येत्या दोन दिवसांत आपणाला तिकीट जाहीर होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्याकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार, असेही ते म्हणाले होते. 

श्री. साळगावकर हे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. आता ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने ते राजीनामा देत आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर अनेक इच्छुक नगराध्यक्षांच्या पोटनिवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. काहींनी तशी इच्छाही व्यक्‍त केली असून राष्ट्रवादी व्यापार व उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपण निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले, तर आपण घेतलेल्या निर्णयाबाबत अनेकांनी आपल्याशी संपर्क साधून पाठिंबा दर्शविला आहे. राजीनामा दिल्यानंतर 4 तारखेला आपण उमेदवारी अर्ज भरणार असून तशी तयारीही पूर्ण केली आहे, असे श्री. साळगावकर म्हणाले. 

साळगावकर भावुक 
आजच्या पालिका आढावा बैठकीत साळगावकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगून आपल्या कार्यकाळात साथ देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आभार मानले. यावेळी साळगावकरांच्या निर्णयावर सर्व अधिकारी भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या या भावनिक प्रतिसादानंतर साळगावरांना रडू कोसळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baban Salgaonkar will resign on Thursday