रसायनी सावळे मार्गे रस्त्याची दुरावस्था 

लक्ष्मण डुबे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सावळे मार्गे कोन रस्त्यावरून औद्योगिक क्षेत्रातील, क्षेत्रा बाहेरील कारखान्यांत आणि रसायनी परीसरातील गावांकडे पनवेल, नवीमुंबई, मुंबईहून येणाऱ्या वाहनांची भरपूर वर्दळ वाढली आहे. दरम्यान रस्त्यावर पावसाळयात लवकर खड्डे पडतात आणि वाहन चालकांचे जाताना हाल होतात.

रसायनी (रायगड) - रसायनी सावळे मार्गे कोन या रस्त्यावर ठीक ठीकानी खड्डे  पडुन रस्त्याची  दुरावस्था झाली आहे. जाताना वाहन चालाकांचे हाल होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत, तसेच या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटात बांधकाम करण्यात यावे अशी मागणी पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोसिएशनने केली आहे. 

पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र तसेच क्षेत्र बाहेर झपाट्याने औद्योगिक विकास होत आहे. तसेच रसायनी पाताळगंगा परीसरात आणि या रस्त्याच्या मार्गावरील गावात गृहप्रकल्प, गोदाम यांची संख्या वाढत चालली आहे. सावळे मार्गे कोन रस्त्यावरून औद्योगिक क्षेत्रातील, क्षेत्रा बाहेरील कारखान्यांत आणि रसायनी परीसरातील गावांकडे पनवेल, नवी मुंबई, मुंबईहून येणाऱ्या वाहनांची भरपूर वर्दळ वाढली आहे. 

दरम्यान रस्त्यावर पावसाळयात लवकर खड्डे पडतात आणि वाहन चालकांचे जाताना हाल होतात. तर खड्डयांच्या त्रासामुळे रसायनी पाताळगंगा परीसरातील दोन, तीन, चार चाकी हलक्या अनेक वाहन चालाकांनी या रस्त्यावरून पनवेल, नवी मुंबईकडे जाणे बंद केले आहे. दांड मार्गे जात असल्याचे सांगण्यात आले.  

Rasayani

पनवेलकडे जाताना हा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्या वाहतुकीचा ताण वाढत  आहे. भविष्यात आजुन वाहतुक वाढण्याची शक्यता आहे. वाढता ताण लक्षात घेऊन हा रस्ता चौपदरी आणि रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचा झाला पाहिजे. या मागणी बाबत आसोशिएशनचा जिल्हाधिकारी आणि शासनाच्या इतर विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- रोहिदास गायकवाड, सहसचिव, पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशन
 

Web Title: Bad Condition Of Rasayani Savale Road