बहुजन महासंघाचा संकल्प मेळावा संपन्न

अमित गवळे 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पाली : भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचा संकल्प मेळावा नुकताच खोपली येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारिप बहुजन महासंघात जाहीररीत्या प्रवेश केला.

पाली : भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचा संकल्प मेळावा नुकताच खोपली येथील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारिप बहुजन महासंघात जाहीररीत्या प्रवेश केला.

भारिप बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे व जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, जिल्हा सचिव रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारिपचे सुधागड तालुकाध्यक्ष अमित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीररित्या प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांनी स्वागत केले.

''रायगड जिल्ह्यात बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना बलाढ्य व मजबूत होत आहे. भारिप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांनी सुधागडसह जिल्ह्यातील बहुजन समाजाला, आदिवासी वाड्यापाड्यातील समाजबांधवांना भारिप बहुजन महासंघाशी जोडण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण काम सुरु केले आहे''. असे पदाधिकार्यांचे म्हणणे आहे.

यावेळी अमित गायकवाड म्हणाले की "भारिप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी व बहुजन समाजाला घातक ठरणार्‍या विविध शासन धोरणांना कडाडून विरोध करीत आहेत. त्यांच्या न्यायहक्कासाठी ताकदीचे आंदोलन उभे करुन दबावतंत्राने मनुवाद्यांचा कुटील डाव व षडयंत्र हाणून पाडत आहेत.''

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृती बंद करणे, तसेच ऍट्रॉसिटी ऍक्ट कायद्यातील अटी शिथील करुन मागसवर्गीय घटकांच्या संरक्षण कवचाला तडा देऊ पाहणार्‍या प्रवृत्तीविरोधात संविधानिक मार्गाने व्यापक स्वरुपाचे जनआंदोलन उभारले जात आहे. तसेच भिमाकोरेगाव हल्ल्यातील सुत्रधारांना अटक करण्याकरीता तालुका,जिल्हा व राज्यपातळीवर देण्यात येणारी मागणीचे निवेदन, मोर्चे, घंटानाद आंदोलन आदींनी वातावरण ढवळून निघाले असल्याचे गायकवाड म्हणाले.

तर मंगेश वाघमारे म्हणाले की ''आंबेडकरी बहुजन समाज, आदिवासी, ठाकूर, धनगर समाज आंबेडकरी घराण्याकडे आकर्षित होत आहे. येत्या काळात रायगड जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघ अधिक बलाढ्य व मजबुतीने उभा राहणार अाहे.'' 

 

Web Title: Bahujan Mahasangh's resolution rally concludes