पालीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बल्लाळेश्वर देवस्थानचा पुढाकार

पालीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बल्लाळेश्वर देवस्थानचा पुढाकार

पाली : पालीकरांना भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बल्लाळेश्वर देवस्थानने पुढाकार घेतला. पाली गावाला पाणी पुरवठा करणारे मोटार पंप वारंवार नादुरूस्त होऊन पालीकरांना सतत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे बल्लाळेश्वर देवस्थानने पाली ग्रामपंचायतीला नुकतेच 20 एचपी क्षमतेचा मोटारपंप भेट दिला. यामुळे पालीकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.

पालीकरांना येथील आंबा नदीवर असलेल्या जॅकवेलमधून पाणीपुरवठा होतो. येथे असलेल्या पंप हाऊसमधील चार मोटार पंपाद्वारे पाणी खेचून ते सरसगड किल्ल्याजवळ असलेल्या साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते. वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा, वाढता विद्दुत दाब, उष्मा अशा अनेक कारणांमुळे हे मोटारपंप नादुरस्त होत असतात. सद्यस्थितीत पाली ग्रामपंचायतीकडे सात मोटारपंप असून त्यातील 3 पंप दुरुस्तीसाठी गेले आहेत. त्यामुळे बिघडलेला मोटारपंप दुरुस्त होईपर्यंत अनेक वेळा पालीकरांना कृत्रीम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत एखादा मोटारपंप राखीव असल्यास नादुरस्त पंप दुरुस्त होईपर्यंत त्याचा वापर करुन पालीकरांची पाण्याची गरज भागवता येवू शकते. ही बाब पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बालके व सदस्यांनी बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप व त्यांच्या विश्वत मंडळाकडे मांडली. यावर बल्लाळेश्वर देवस्थानने तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पालीकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तब्बल 70 हजारांहून अधिक किमतीची 20 एच.पी क्षमेतचा मोटारपंप पाली ग्रामपंचायतीला भेट दिला.

यावेळी पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बालके, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप, उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे, विश्वस्त सचिन साठे, उपेंद्र कानडे, विनय मराठे, राहूल मराठे यांच्यासह पाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय मराठे, ग्रा.पं. सदस्य अमित निंबाळकर, भास्कर दुर्गे, अजय मुळे यांच्यासह प्रदिप गोळे, शेखर सोमन, वासुदेव मराठे, पद्माकर फाटक यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com