बांबू पिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर - के. मंजूलक्ष्मी

बांबू पिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर - के. मंजूलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी - कमी कालावधीमध्ये चांगले उत्पादन मिळवून देणारे बांबू हे पिक आहे. जिल्ह्यातील वातावरणामध्ये बांबूचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्‍वास जिल्हा परिषदच्या मुख्याकार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी येथे व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये आज आयोजित बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजीत सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पराडकर, कमलाकर रणदिवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बांबू लागवडीविषयी मार्गदर्शक मिलिंद पाटील आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

2018-19 मध्ये बांबू लागवड अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, ""या अभियानासाठी ग्राम पातळीवरचे नियोजन महत्वाचे आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यासाठीचा परिपूर्ण नियोजन अाराखडा तयार करावा. बांबूच्या जाती त्यांचे उत्पादन आणि त्यांचा शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याचे नियोजन तयार करावे. त्यामुळे अभियान यशस्वीरित्या पूर्ण करता येईल. 10 डिसेंबरपर्यंत तालुका स्तरावर बांबू लागवडी विषयी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यामाध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहचवली जाणार आहे. 4 लाख बांबू लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.''

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप यांनी या अभियानाची महिती दिली. तर मिलिंद पाटील यांनी बांबू लागवडी विषयी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील बांबूची लागवड, त्याचे अर्थकारण व फायदेही सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी प्रस्तावना केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी शेतकऱ्यांसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचे सांगून या अभियानासाठी शुभेच्छा दिल्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com