पनवेल: बामणोली धरणावर पर्यटकांची गर्दी

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जांभिवली गावा पर्यंत पनवेलहुन एस टी बसने आणि रिक्षाने किंवा स्वाताच्या वाहनाने जाता येते. जांभिवली पासुन धरणा पर्यंत साधारण दीड किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. त्यामळे वाहन घेऊन जाणे त्रासाचे आहे. पायपीट करत गेला तर शिवरातील पिकांनी बहरलेले शेतं बघण्याचा आंनद घेता येतो. 

रसायनी (रायगड) : पनवेल तालुक्यातील रसायनीतील जांभिवली गावाच्या हद्दितील बामणोली धरणावर पावसाळी पर्यटकांची गर्दी वाढु लागली आहे. रसायनीतील वासांबे मोहोपाडा आणि पनवेल परिसरातील पर्यटक येथे येत असतात. 

घेरामाणिक गडाच्या पायथ्याशी चौतीस वर्षापुर्वी हे धरण बांधण्यात आले आहे. पावसाळ्यात धरण भरले की भरलेला मोठा जलाशय आणि सांडव्यातुन बाहेर पडणारे फेसाळलेले पाणी आणि डोंगर रांगाचा हिरवागार  निसर्ग रम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे. तसेच बामणोली धरणाच्या पाण्याचा जांभिवली व इतर गावाच्या शेतक-यांना मोठा आधार झाला आहे. जांभिवली गावा पासुन ते धरणा पर्यंत शिवारातील पावसाळी खरीपाच्या हंगामातील भाताचे तसेच रब्बीच्या हंगामातील भाताचे आणि भाजी पाल्याचे मळे जाताना मन वेधुन घेतात. पावसाळ्या बरोबर  हिवाळ्यातही धरणावर पर्यटकांची रेलचेल सुरू असते. 

जांभिवली गावा पर्यंत पनवेलहुन एस टी बसने आणि रिक्षाने किंवा स्वाताच्या वाहनाने जाता येते. जांभिवली पासुन धरणा पर्यंत साधारण दीड किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. त्यामळे वाहन घेऊन जाणे त्रासाचे आहे. पायपीट करत गेला तर शिवरातील पिकांनी बहरलेले शेतं बघण्याचा आंनद घेता येतो. 

धरणाच्या पाण्याची पातळी पंधरा मीटर इतकी खोला आहे. पाण्यात उतरण्यास बंदी घातलेली आहे. त्यामळे सुरक्षेतेच्या दृष्टिने पाण्यात कोणीही उतरू नये असे पाटबंधारे विभागातुन सांगण्यात आहे. 

Web Title: bamnoli waterfall in Raigad district