दोडामार्ग तालुक्‍यात सरसकट वृक्षतोड बंदी

सागर कुंभार
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सावंतवाडी - दोडामार्ग तालुक्‍यात वृक्षतोडीसाठी सरसकट बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच आदेश येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात होणारी झाडाची कत्तल रोखण्यास मदत होणार आहे, असा विश्‍वास श्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी - दोडामार्ग तालुक्‍यात वृक्षतोडीसाठी सरसकट बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच आदेश येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात होणारी झाडाची कत्तल रोखण्यास मदत होणार आहे, असा विश्‍वास श्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

दोडामार्ग तालुक्‍यात संपन्न वनक्षेत्र आहे. येथे पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा हालचाली गेल्या काही वर्षात सुरू होत्या. यात प्रामुख्याने पर्यावरणाला घातक खनिज प्रकल्पांचा प्रस्ताव, बेसुमार वृक्षतोड, झाडे तोडून त्याठिकाणी रबर व अननस बागायती आदींचा समावेश होतो. आंबोली (सावंतवाडी) ते मांगेली हा पश्‍चिम घाटातील पट्‌टा वाघाचा कॉरीडॉर आहे. या हालचालीमुळे येथील पर्यावरणाबरोबरच हा कॉरीडॉर धोक्‍यात आला होता.

याबाबत वनशक्ती या पर्यावरण प्रेमी संस्थेच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर दिर्घकाळ सुनावणी सुरू आहे. सावंतवाडी आणी दोडामार्ग तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. खनिज प्रकल्प सुरू होत आहेत. त्यामुळे हा भाग इकोसेन्सेटीव्ह जाहीर करण्यात यावा अशी मागणी याचीकेतून करण्यात आली होती. माधव गाडगीळ समितीने पश्‍चिम घाट अहवालात दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटीव्ह करण्याची शिफारस केली होती. मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने इकोसेन्सिटीव्हमधून पूर्ण दोडामार्ग तालुका वगळला होता. मात्र वनशक्‍तिच्या याचीकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने येथील पर्यावरण संरक्षणाचे आदेश दिले होते. तरीही वृक्षतोड होत असल्याचा मुद्‌दा याचीकाकर्त्यांनी मांडला. यावर दोडामार्गला वनक्षेत्राचा दर्जा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. असे राज्यशासनाकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. या पार्श्‍वभूमिवर पूर्ण दोडामार्ग तालुक्‍यात वृक्षतोड बंदीचा आदेश जारी झाला आहे. 

या निर्णयात दोडामार्ग तालुक्‍याचा सरसकट समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वृक्षतोड बंदीवर चाप बसणार आहे; मात्र दुसरीकडे त्याचा फटका एखाद्या शेतकऱ्याला अथवा स्थानिक ग्रामस्थाला गरजेसाठी झाडे तोडताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासन झाले जागे 
आंबोली ते मांगेली हा व्याघ्र कॉरीडॉर संरक्षीत करण्याबाबत उच्च न्यायालयाने याआधीच सुचनाल दिल्या आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीत चालढकल होत होती. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्‍त केली होती. वनविभागाच्या सचिवांनी याभागातील वृक्षतोडीबाबत चार आठवड्यात तपशील देण्याचे आदेश दिले होते. यानंतर यंत्रणा वेगाने हालली. आणि वृक्षतोड बंदी लागू झाली. 

""दोडामार्गमध्ये सरसकट वृक्षतोड बंदीचे आदेश प्राप्त झाले आहेत. यावर त्वरीत अंमलबजावणी होईल. या भागातील जंगल राखण्यास याचा उपयोग होणार आहे.''
- समाधान चव्हाण
, उपवनसंरक्षक, सावंतवाडी वनविभाग  

Web Title: ban on tree cutting in Dodamarg Taluka