शिवसेना - भाजपमध्ये आठ डिसेंबरला 'येथे" होणार लढत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद हे रिक्त झाले होते. सध्या भाजपचे अक्रम खान हे प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

बांदा ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या बांदा शहर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक ही 8 डिसेंबरला जाहीर झाली आहे. शिवसेना व भाजपमध्ये थेट निवडणूक होणार असल्याने इच्छुकांच्या चाचपणीसाठी दोन्ही पक्षांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, सरपंच मंदार कल्याणकर यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद हे रिक्त झाले होते. सध्या भाजपचे अक्रम खान हे प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

22 नोव्हेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी 8 डिसेंबरला निवडणूक जाहीर केली आहे. 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. 22 नोव्हेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी व 25 ला नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी वेळ दिलेला आहे. या निवडणुकीसाठी मतदान 8 डिसेंबरला होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 4 दिवसांचा कालावधी उरल्याने दोन्ही पक्षांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. या सरपंच निवडणूकीत शिवसेना व भाजप यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्‍यता आहे.

भाजपला खुर्ची राखण्याचे आवाहन

सत्ताधारी भाजपला सरपंच पदाची खुर्ची राखण्याचे आवाहन आहे. तर शिवसेनेला ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच सरपंचपदी विराजमान होण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. सरपंचपद खुले असल्याने दोन्ही पक्ष कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरविणार यावर बेरजेची गणिते अवलंबून आहेत. सद्यस्थितीत दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. सरपंचपदासाठी दोन्ही पक्षांकडून उमेदवार कोण असेल हे येत्या 2-3 दिवसात स्पष्ट होईल.

आणखी वाचा - 

दोडामार्ग तालुका गोव्यामध्ये विलिन करण्याच्या मागणी मागे आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

विशाल गोमंतक, कोकण राज्य या मागणीत दडलयं काय ?

गोव्यात विलीनीकरणामागे कशाचे आहे आकर्षण ? 

गोव्याला या भूभागाची गरज आहे का?

गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचा प्रयत्न झाला होता, पण... 

मुक्तीनंतर थक्क करणारी गोव्याची वाटचाल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banda Gram panchayat Election On Eight December