इन्सुली घाटीत दरडीचे संकट कायम

इन्सुली घाटीत दरडीचे संकट कायम

महामार्ग, वन खाते निद्रावस्थेत - धोकादायक झाडे, दरड हटविणार कधी?
बांदा - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. गतवर्षी महामार्गावर भले मोठे झाड कोसळले होते. यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. यू आकाराच्या वळणावर दरड कोसळून डोंगराची माती महामार्गावर येऊन वाहतूक बंद झाली होती. या घाटात जीवघेणे प्रकार घडत असतानाही महामार्ग विभाग आणि वन खाते निद्रावस्थेत असल्याने स्थानिक व वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. तसेच या ठिकाणी असलेले धोकादायक झाडे, दरड तातडीने हटविण्याची मागणी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटी सतत घडणाऱ्या अपघातामुळे नेहमी चर्चेत राहीली. महामार्ग विभाग आणि वनखाते यांच्या आडमुठ्या धोरणामुळे या ठिकाणी अपघातात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले; मात्र असा धोकादायक घाट असतानाही या ठिकाणी शासन फारसे गंभीर नाही. राजकीय इच्छाशक्ती असतानाही शासनाच्या साचेबद्द धोरणामुळे हा घाट अद्यापही वारंवार वाहनधारकांना झटके 
देत आहे.

झाराप पत्रादेवी बायपास महामार्गामुळे या घाटातील वाहन वाहनांची संख्या थोडीफार कमी झाली; मात्र सावंतवाडी शहर तसेच पुणे-बेंगलोर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांसाठी या घाटातुनच जावे लागते. सद्यस्थितीत या घाटात छोटे अपघात होणे सुरूच असतात. अपघाताचे प्रमाण कमी झाले तरी या घाटात झाडे कोसळण्याचा प्रकार सुरूच असतात. गतवर्षी पावसाळ्यात भला मोठा वृक्ष कोसळला होता. रात्रीच्यावेळी पडलेल्या या झाडाचा अंदाज न आल्याने गोवा येथील दुचाकीस्वार झाडाला येवुन धडकला होता. येथील स्थानिकांनी त्याला बाहेर काढले होते. सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. त्याचप्रमाणे दरड, दगड, माती वाहुन येण्याचे प्रकार मोठ्या पावसात सुरूच असतात; मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करतात. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य (कै) नंदू पेडणेकर यांनीही आंदोलन केले होते. त्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्या पालव यांनी वेळोवेळी दोन्ही विभागांना लेखी पत्र देत पाठपुरावा केला; मात्र याकडे दोन्ही विभाग गंभीर नसल्याने हे घोंगडे भिजतच रािहले.

पत्रव्यवहारानंतर रस्ता रोकोही करण्यात आला होता. या वेळी सावंतवाडी वनसंरक्षक यांनी आपण लवरकच या धोकादायक झाडे हटविणार असल्याचे सांगितले होते. रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांच्या आड राहून संबधित विभागानी ते आंदोलनही चिरडले होते. दोन्ही विभागाकडून या धोकादायक झाडांचा पंचनामा करत एकुण चाळीस झाडे धोकादायक असल्याचा अहवाल सादर केला होता. सद्यस्थितीत या धोकादायक झाडाबरोबरच दगड, दरड कोसळण्याचे प्रमाण सुरू आहे; मात्र याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने वाहनधारकांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त 
होत आहे.

उत्कर्षचे कार्यकर्ते बनताहेत देवदूत
या घाटात अपघात असो अथवा झाड, दरड कोसळू दे या ठिकाणी नेहमी देवदुत म्हणून उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळ इन्सुली डोबाचीशेळ येथील कार्यकर्ते धावत येतात. भर पावसात या ठिकाणी येऊन मदतकार्य करतात. रात्री अपरात्री धावणाऱ्या या कार्यकर्त्यांना कोणतीच गरच नसताना केवळ आपल्या गावात येऊन कोणत्याच वाहनधारकांची गैरसोय होता नये, या उद्देशाने ते नेहमी मदतकार्य करतात. त्यामुळे घाटात अडकलेल्या वाहनधारकांसाठी ते कार्यकर्ते देवदुतच म्हणावे लागेल.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
गेली अनेक वर्षे या घाटात धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे; मात्र लोकप्रतिनिधी केवळ तेवढ्यापुरतेच डोके वर काढतात. याठिकाणी मोठा लढा उभारून या मार्गावर असलेले अडथळे दूर करणे गरजे आहे; मात्र प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने हा घाट दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com