माकडतापाने सटमटवाडीत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

बांदा - माकडतापाने अनुसया लवू परब (वय 75, रा. बांदा-सटमटवाडी) या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. या परिसरात आतापर्यंत 13 जणांचा माकडतापाने बळी घेतला आहे. यामध्ये सटमटवाडीतील सात जणांचा समावेश आहे. पावसाळ्यात माकडतापाची तीव्रता कमी होईल, हा आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला आहे. परब यांना 12 जूनपासून किरकोळ स्वरूपात ताप येत होता. त्यामुळे त्यांना 13 जूनला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर म्हापसा (गोवा) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही उपचारांना त्यांच्याकडून साथ न मिळाल्याने त्यांना गोवा बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्या कोमातून बाहेर आल्यानंतर त्यांना घरी नेण्यात आले. मात्र, गेले आठ दिवस त्या अंथरुणाला खिळूनच होत्या. आज पहाटे अडीचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
Web Title: banda konkan news old women death by monkey flu