पुलवामातील हल्ल्याच्या निषेधार्थ पालीत कडकडीत बंद

Pali.jpg
Pali.jpg

पाली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा येथील गोरिपुरा भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता.17) पालीत कडकडीत बंद करण्यात आला होता. यावेळी पाली गावातुन काढलेल्या रॅलीत पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. 
<

 येथील शिवाजी महाराज स्मारकापासून रॅलीला सुरुवात झाली. भारताचा राष्ट्रध्वज, श्रद्धांजली व निषेधाचे फलक हातात घेऊन भारतीय लष्कराचा जयघोष करत व पाकिस्तान विरोधी घोषणा देत रॅली संपूर्ण पालीतून फिरली. शिवाजी महाराज स्मारकाजवळ रॅलीची सांगता झाली. शनिवारी (ता.16) रात्री आठ ते सव्वा आठ या वेळेत सर्व पालीची वीज बंद करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पालीकर ग्रामस्थ हातात मेणबत्या घेऊन बल्लाळेश्वर मंदिराजवळ जमले होते. या निषेध रॅलीत पालीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com