बांद्रा ते मंगलूर विशेष रेल्वे गाडी

बांद्रा ते मंगलूर विशेष रेल्वे गाडी

कणकवली - पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर बांद्रा (टी) आणि मंगळुरू जंक्‍शन दरम्यान सुटीच्या कालावाधीत  ७  व ८ फेब्रवारीला विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

गाडी क्रमांक ०९००९ बांद्रा (टी) ही विशेष गाडी ७ फेब्रुवारीला (गुरुवार) २३:४५ वाजता बांद्रा (टी) येथून निघेल. मंगळुरूला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता पोचेल. परतीसाठी गाडी क्रमांक ०९०१० मंगलूर येथून ०८ फेब्रुवारीला (शुक्रवार) रात्री ११ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ७.३० वाजता बांद्रा (टी) येथे पोचेल.

या गाडीला बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, मंडगाव जंक्‍शन, कारवार, कुमठा, भटकळ, मुकुंबिका रोड, बेंदूर, कुंडापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरथकल स्टेशन येथे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला २२ एलएचबी कोच असून, यात २ टायर एसी १ कोच, ३ टायर एसी ४ कोच, स्लीपर १३ कोच,  आणि जनरल २ कोच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com