चिपळूण शहर विकासाला बॅंकांचे योगदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

चिपळूण - शहराच्या विकासामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांनी योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे. बॅंकांच्या सहभागातून शहराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी शहरातील बॅंकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. 

चिपळूण - शहराच्या विकासामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांनी योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे. बॅंकांच्या सहभागातून शहराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी शहरातील बॅंकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. 

पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने गेल्यावर्षी शहरात पर्यटन महोत्सव झाला. यानिमित्ताने लोकसहभागातून काही पर्यटनस्थळे विकसित करण्यात आली. शहरातील मोक्‍याची ठिकाणे विकसित करण्यात आली. रोटरी आणि लायन्स क्‍लबने शहर विकासामध्ये योगदान दिले. शिवनदीत कचरा पडू नये म्हणून प्रयत्न झाले. शिवाजीनगर बसस्थानक, उक्ताड चौक, चिंच नाका आणि गुहागर नाका येथील चौक विकसित करण्यात आले. याच धर्तीवर शहरातील अनेक चौक विकसित करून त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांना हाक दिली.

चिपळूण शहरात ज्या राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखा आहेत, त्या सर्व बॅंकांच्या शाखाप्रमुखांना पालिकेत बोलाविण्यात आले होते. पालिकेचे ज्या बॅंकेत खाते आहे, त्या बॅंकांकडून सर्व खात्यांचा आढावा घेण्यात आला. कोणत्या बॅंकेत पालिकेचा किती निधी शिल्लक आहे, याची माहिती नगराध्यक्षांनी घेतली. राष्ट्रीयीकृत बॅंकांना सीएसआरचा निधी असतो. पूर्वी बॅंक आणि पालिकेचे अधिकारी परस्पर निधी खर्च केल्याचे दाखवत होते. यावेळी तसे होऊ नये म्हणून नगराध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी बॅंकांनी योगदान द्यावे, असे आवाहन सौ. खेराडेंनी केल्यानंतर सर्वच बॅंकांच्या शाखाप्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

बॅंकांचा सीएसआर निधी शहरातील विकासकामांसाठी मिळावा, अशी मागणी आम्ही राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखाप्रमुखांना केल्यानंतर सर्वच बॅंकांनी तयारी दर्शवली आहे. शहरातील काही ठिकाणे आम्ही निश्‍चित केली आहेत. ते ठिकाण विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जी बॅंक आम्हाला सीएसआरचा निधी देईल, त्या बॅंकेचे फलक आम्ही त्या ठिकाणी लावणार आहेत.
- सुरेखा खेराडे, नगराध्यक्षा, चिपळूण पालिका.

Web Title: bank support to chiplun city development