esakal | देवरुखात शंभर टक्के लॉकडाउन यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

basis of corona patients increased day by day in devrukh causes 8 days lockdown in city

अॉफ महाराष्ट्र आणि भारतीय स्टेट बॅंक शाखा देवरुखनेही बॅंकेचे कामकाज बंद ठेवले आहे.

देवरुखात शंभर टक्के लॉकडाउन यशस्वी

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

देवरुख : देवरुख - साडवली परीसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवुन देवरुख नगरपंचायतीने शहर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची देवरुख व्यापारी वर्गाने व्यापार बंद ठेवून आठ दिवसाच्या लॉकडाउन काळातला पहीला दिवस शंभर टक्के यशस्वी केला. विशेष म्हणजे बॅंक अॉफ महाराष्ट्र आणि भारतीय स्टेट बॅंक शाखा देवरुखनेही बॅंकेचे कामकाज बंद ठेवले आहे.

हेही वाचा - कोकणात माहीची हुशारी; काही तासातच लावला छडा..

नागरीकांच्या आरोग्यासाठी देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांनी व्यापारी वर्गाने आठ दिवस बंद ठेवावा, अशी बैठक घेवुन विनंती केली होती. यावेळी किराणा व्यापारी, भाजी विक्रेते, केमिस्ट ,दुध विक्री करणारे व्यापारी उपस्थित होते. यावेळी देवरुख व्यापारी संघटनेने शंभर टक्के व्यापार बंद राहील अशी हमीही दिली होती. गणेशविसर्जना दिवशीच बाजारपेठ लॉकडाउन करण्यात आली. यामुळे कडकडीत बंदची व्याख्या खरी ठरली. 

सर्वांनीच व्यापार बंद ठेवुन लॉकडाउनचा पहिला दिवस शंभर टक्के बंद करुन दाखवला. या काळात रिक्षा व्यावसायिकांनी रिक्षा व्यवसाय बंद ठेवली. एस.टी. आगाराने काही फेर्‍या रद्द केल्याने  बसस्थानकातही शुकशुकाट पहायला मिळाला. चौकाचौकात दुध विक्री सुरु होती. केमिस्ट दुकानदारांनी सकाळी ९ ते दुपारी २ ही वेळतच विक्री केली.

हेही वाचा -  नाणार रिफायनरीला पूर्ण विराम ? वाचा सविस्तर...

शहर बंद राहणार म्हटल्यावर नागरीकांनीही याला प्रतिसाद म्हणून घराबाहेर जाणे टाळले. मात्र वृत्तपत्रांचेही स्टॉल बंद असल्याने वाचक बैचेन झाल्याचे दिसून आले. नागरीकांनीच हा लॉकडाउन जाहीर केल्याने शासन, पोलीस स्टेशन यांना यात फारसे लक्ष घालावे लागले नाही. कोरोनाशी लढा देण्यासाठी देवरुख शहरवासियांनी संयमाचे पालन केले. 

 संपादन - स्नेहल कदम