लक्‍झरी क्रुझच्या रत्नागिरी थांब्यासाठी बॅथोमेट्री सर्व्हे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

रत्नागिरी - मुंबई - गोवा जलमार्गावरील लक्‍झरी क्रुझला रत्नागिरी थांबा मिळण्याची शक्‍यता आहे. पर्यटनाला अधिक चालना मिळण्याच्यादृष्टीने हे पाऊल आहे. त्याअनुषंगाने मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून बॅथोमेट्री सर्व्हे झाला. येथील भगवतीबंदर परिसरात हा सर्व्हे झाला असून तो यशस्वी झाल्याचे समजते. त्यामुळे लवकरच या क्रुझला रत्नागिरी थांबा मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मुंबई - गोवा क्रुझ जलप्रवासाचा प्रारंभ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सर्वच व्हीआयपी सुविधा या क्रुझमध्ये आहेत. लक्‍झरी रूमस्‌, हॉटेल यासह अनेक सुविधांचा पर्यटकांना आस्वाद घेता येतो. जलपर्यटनाची सफर करण्यास देशी-विदेशी पर्यटकांनी या सफरीला चांगला प्रतिसाद दिला. परंतु रत्नागिरीत या क्रुझला थांबाच नाही. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला.

कोकणाच्यादृष्टीने रत्नागिरीत थांबा मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली. याचा विचार आता मेरीटाईम बोर्डाने केला आहे. क्रुझला भगवती बंदर परिसरात थांबा देता येईल का, या अनुषंगाने एका कंपनीकडून भगवती बंदर परिसरात बॅथोमेट्री सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेचा अहवाल मुंबई मेरीटाईम बोर्डाकडे कंपनीने सादर केलेला आहे. क्रुझला थांबा देण्याच्या अनुषंगाने कंपनीने सकारात्मक अहवाल दिला असल्याचे समजते. 

रत्नागिरीत क्रुझ थांबा झाल्यास जिल्ह्यात पर्यटनवाढीला चांगला वाव मिळणार आहे. कोकणाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक चांगली पर्यटन स्थळे असल्याने पर्यटक क्रुझने रत्नागिरीत थांबू शकतात. थांबा करण्याच्यादृष्टीनेच मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यालयातून हालचाली सुरू आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Battometry Survey for Luxury Cruise Ratnagiri Strike