सावधान ! वैभववाडीत एका दिवसात कोरोनाचे 8 नवे रूग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

आतापर्यंत सापडलेले रूग्ण हे मुंबई किवा अन्य शहरातुन आलेले होते. ते संस्थात्मक क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन असतानाच त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर संसर्ग होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते; परंतु गेल्या चार पाच दिवसात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढली आहे. 

 वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) -  ऐन गणेशोत्सवात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. आज एका दिवसात 8 रूग्ण सापडले आहेत. तहसिल कार्यालय, वीज वितरण कार्यालयातील एक एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वैभववाडी शहरात रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील रूग्णांची संख्या 43 वर पोहोचली असुन त्यातील 21 रूग्ण सक्रीय आहेत. 
तालुका कोरोनापासुन काही अंशी सुरक्षित मानला जात होता.

आतापर्यंत सापडलेले रूग्ण हे मुंबई किवा अन्य शहरातुन आलेले होते. ते संस्थात्मक क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन असतानाच त्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर संसर्ग होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य होते; परंतु गेल्या चार पाच दिवसात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढली आहे. 

विशेष म्हणजे सार्वजनिक कार्यालयात काम करणारे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. वैभववाडी तालुक्‍यात गेल्या चार पाच दिवसात 15 हुन अधिक रूग्ण सापडले आहेत. या रूग्णांमध्ये एक बॅंक कर्मचारी, एक तहसिल कार्यालयातील कर्मचारी, एक विज वितरणच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वैभववाडी शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. 

करूळ, खांबाळे या गावांमध्ये स्थानिक संसर्गाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडुन जागे झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत असुन काहींचे स्वॅब तपासणीकरीता घेतले जात आहेत. आतापर्यत वैभववाडी तालुक्‍यात सापडलेले रूग्ण हे इतर शहरांमधुन आलेले होते; परंतु आता स्थानिक पातळीवर हा संसर्ग होऊ लागल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्‍यात सध्या 21 रूग्ण सक्रीय आहेत. तालुक्‍यातील कोरोना रूग्णांची संख्या 43 वर पोहोचली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be Careful 8 New Patients Of Corona In One Day In Vaibhavwadi