अाईस्क्रिम खाताय...? जरा जपून!

अमित गवळे
रविवार, 6 मे 2018

अाईस्क्रिम दुकानातून खरेदी केलल्या मँगो कुल्फीमधून चक्क स्प्रिंग सदृश्य धातूची तार निघाली आहे. सुदैवाने खाणाऱ्यांच्या ही बाब लगेच लक्षात अाल्याने मोठा प्रसंग टळला.

पाली (जि. रायगड) - उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळेच जण शरिराला थंडावा मिळण्यासाठी अाईस्क्रिम व कोल्ड्रिकला पसंती देतात. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड व लोकल कंपन्याच्या अाईस्क्रिम खातांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण पालीतल एका अाईस्क्रिम दुकानातून खरेदी केलल्या मँगो कुल्फीमधून चक्क स्प्रिंग सदृश्य धातूची तार निघाली आहे. सुदैवाने खाणाऱ्यांच्या ही बाब लगेच लक्षात अाल्याने मोठा प्रसंग टळला.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की पालीत राहणारे स्वराज मोरे हा तरुण शुक्रवारी (ता. 4) रात्री साखरपुड्यावरुन परतल्यावर अापल्या दोन मित्रांसमवेत येथील भोईअाळितील सुखसागर डेअरी मधून अाईसक्रिम खाण्यासाठी गेला. तेथून त्याने पंधरा रुपयांच्या तीन मँगो कुल्फी खरेदी केल्या. कुल्फी खात असतांना त्याच्या जिभेला काही तरी टोचल्यावर त्याने पाहिले असता कुल्फी मध्ये चक्क स्प्रिंग सदृश्य धातूची तार होती. ताबडतोब प्रसंगावधानता दाखवत त्याने दुकानदाराच्या हि गोष्ट निदर्शनास अाणून दिली. ही कुल्फी अमुल कंपनीच्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आली होती. दुकानदारास कुल्फी कोणत्या कंपनीची अाहे हे विचारल्यावर त्याने खोपोलीतील लोकल कंपनीची असल्याचे स्वराज मोरे या तरुणास सांगितले. दुकानातील नोकराने मालकाला हि गोष्ट सांगतो असे त्यांना सांगितले. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली, असे स्वराजने सांगितले. त्यानंतर स्वराज व त्याचे मित्र तेथून निघून गेले. या संदर्भात स्वराज मोरे पोलीस स्थानकात अाणि अन्न व औषध विभागाकडे या संदर्भात तक्रार करणार आहेत.

खाण्याच्या पदार्थात अशा स्वरुपाच्या वस्तू सापडणे हि बाब अतिशय गंभीर व धोकादायक अाहे. प्रत्येक दुकानदाराने अापल्या दुकानात ठेवलेला माल तपासूनच घेतला पाहीजे. तसेच चालू कंपन्याचे माल दुकानात ठेवू नये. माझ्या ऐवजी जर कोणत्या लहानमुलाने ही कुल्फी खाल्ली असती तर केवढा मोठा अनर्थ झाला असता. अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष देवून अशी दुकाने व विक्रेत्यांवर कारवाई केली पाहिजे. - स्वराज मोरे, पाली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Be careful Ice Cream may be danger