रत्नागिरी- राजापूर सागरी मार्गावरचा हा समुद्रकिनारा तुम्ही पाहिलाय का ?

beach of ganeshgule on the road of ratnagiri rajapur for tourist in pavas rantnagiri
beach of ganeshgule on the road of ratnagiri rajapur for tourist in pavas rantnagiri

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील गणेशगुळे येथील समुद्रकिनारा पर्यटकांना साद घालत आहे. येथील शांत किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत असून ग्रामपंचायतीने या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी समुद्रकिनारे आहेत. त्यांपैकी बहुतांश किनारे हे रस्त्यालगत आहेत; मात्र गणेशगुळे समुद्रकिनारा हा मुख्य रस्त्यापासून थोडा दूर आहे. प्रसिद्ध स्वामी स्वरुपानंद देवस्थानापासून राजापूरकडे जाताना केवळ ४ कि.मी. अंतरावर असलेल्या या किनाऱ्यावर जाण्यासाठी ग्रामपंचायतीने आता रस्ता उपलब्ध करून दिला आहे. परिणामी पर्यटकांना थेट किनाऱ्यावर जाण्यासाठी वाहने घेऊन जाता येते. त्यामुळे पायपीट वाचल्याने अनेक पर्यटक येथील समुद्रकिनाऱ्यावर येत आहेत.

कोरोना काळात कोकणातले पर्यटन बंद होते. आता ते सुरू झाले आहे. नाताळला लागून आलेल्या सुट्टीमध्ये गणपतीपुळे, दापोली, गुहागरचे पर्यटन मोठ्या प्रमाणात बहरले आहे. त्यात आता गणेशगुळे समुद्रकिनाऱ्याची भर पडल्याने पर्यटकांना आणखी एक पर्याय उपलब्ध झालाय. गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यालगत राहण्याची व्यवस्था असल्याने पर्यटकांना समुद्राचा आवाज, निसर्गरम्य परिसर व नीरव शांतता लाभते.

थोडासा निवांतपणा हवा असतो

समुद्रकिनाऱ्यावर दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने प्रचंड गर्दी होते. त्यामुळे अनेकजण थांबायची इच्छा असूनही गर्दीत थांबता येत नाही. त्यांना थोडासा निवांतपणा हवा असतो. त्यांच्यासाठी गणेशगुळे समुद्रकिनारा पर्वणी ठरणारा आहे. रत्नागिरी- राजापूर सागरी मार्गावर गणेशगुळे समुद्रकिनारा शांत असल्यामुळे येथे पर्यटकांना थांबता येते आणि निखळ आनंद घेता येतो.

एक नजर..

  •  किनाऱ्याजवळ प्रसिद्ध स्वयंभू गणेशाचे स्थान 
  •  स्वामी स्वरुपानंद 
  •  समाधी मंदिर
  •  गणेशगुळ्यातील समुद्रकिनारा
  •  स्वयंभू गणपती मंदिर, पूर्णगड किल्लाही
  •  गावखडी समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकांची रेलचेल

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com