कचरा टाकू नये म्हणून सावंतवाडी पालिकेची भन्नाट युक्ती

अनंत पाताडे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सावंतवाडी - आपल्याला एखादा सांडपाण्याचा नाला दिसला तर आपण त्याच्यापासून दूर रहाणेच पसंत करतो. तसेच दुर्गंधी असह्य झाल्यावर नाक- तोंड देखील बंद करतो. विशेष म्हणजे एखादा नाला दिसला की त्यात कचरा फेकण्याची अनेकांना सवय असते. मात्र सावंतवाडीत एक असा नाला आहे. जो सध्या इथून ये- जा करणाऱ्या प्रत्येकालाच आकर्षित करतोय. त्याच कारणही खास आहे. कारण या नाल्यात डोकावल्यावर वन्यजीवांचा मनमोहक नजारा दृष्टीस पडत आहे.

नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने ही भन्नाट संकल्पना राबवत चक्क नाल्याचेच सुशोभीकरण केलेय. यामुळे नागरिकांनी नाल्यात कचरा टाकणे बंद केले आहे. शिवाय नाल्याचे पालटलेले रुपडे पहाण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. या मनमोहक देखाव्यातून प्राणी वाचवण्याचा संदेश देखील दिला जात आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने नाल्याचे हे चित्र बदलले आहे. 

सावंतवाडी मोती तलावा शेजारून एक नाला जातो. या नाल्यात पूर्वी नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असत. त्यामुळे हा नाला वारंवार तुंबत होता. परिणामी वरचेवर पालिकेची डोकेदुखी देखील वाढायची. यावर पालिकेने भन्नाट कल्पना शोधून काढली. चक्क या नाल्याचेच सुशोभीकरण केले. सुरवातीला नाल्याची पूर्ण स्वछता केली गेली. यामध्ये अवनी वाघिणीसह इतर प्राणी पक्षांची प्रतिकृती उभारली. त्यामुळे आता नाल्याचे रुपडं पालटल्याने मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक याठिकाणी गर्दी करत आहेत.

Web Title: Beautification of Nala in Sawantwadi