सिंधुदुर्गातील मळगाव धबधब्याजवळ सुशोभीकरण 

सिंधुदुर्गातील मळगाव धबधब्याजवळ सुशोभीकरण 

सावंतवाडी - येथील मळगाव घाटीमध्ये धबधब्याच्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरू असून धबधब्याचा समोर रेलिंग उभारले आहेत. वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍वभूमीवर दखल घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

पर्यटनाचे आकर्षण बनलेल्या या धबधब्याची व परिसराचे सुशोभिकरण व्हावे, अशा मागणीचे वृत्त गतवर्षी "सकाळ'ने प्रकाशित केले होते. त्यानंतर या धबधब्याला डागडुजीसाठी सुशोभीकरणसाठीचे उद्‌घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. याबाबत पाठपुरावा होणे गरजेचे होते. त्यानुसार धबधब्यासाठी निधी मंजूर करून धबधब्याजवळ जाण्यासाठी चिरेबंदी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. धबधब्याजवळ रोलिंगही बसवले आहेत. त्यामुळे आता या धबधब्यावर पर्यटकांची संख्या वाढणार आहे. या मार्गावरून जाणारा पर्यटक तसेच वाहन चालक येथे थांबून धबधब्याजवळ सेल्फी तसेच फोटो घेताना पाहावयास मिळत आहे. 

बारमाही पर्यटन येथे शक्‍य नसले तरी वर्षा पर्यटन काही प्रमाणात नक्की होऊ शकते. त्यासाठी मळगाव घाटीही तेवढीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे; मात्र दोन वर्षांत मळगाव घाटीमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे दिसते. घाटीच्या सौंदर्याला कचऱ्यामुळे ग्रहण लागत आहे. घाटीत टाकलेला कचरा पावसाळ्यात वाहत जाऊन घाटीत खाली तसेच गटारात अडकतो. त्यामुळे घाटीतील कचऱ्याची समस्या दूर होणे गरजेचे आहे. 

पर्यटकांचा "सेल्फी पॉईंट' 
शहरापासून हाकेच्या अंतरावर तसेच गोवा व वेंगुर्लेच्या दिशेने जाताना मळगाव घाटी लागते. वर्षा ऋतूमध्ये येथील तीन ते चार ठिकाणी धबधबे वाहतात; मात्र घाटीतील वळणावरच असलेला धबधबा सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. गेल्या काही वर्षांमध्ये हा धबधबा वाहनधारकांचे व पर्यटकांचा "सेल्फी पॉईंट' बनला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com